breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बांधकाम मजुरांच्या बॅंक खात्यात थेट लाभ द्या – बाबा कांबळे

पुणे कामगार कार्यालयावर बांधकाम मजुरांचा महामोर्चा 
पुणे ( महा ई न्यूज ) – शिवाजीनगर येथील कामगार कार्यालयावर बांधकाम मजुरांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी (दि.13) मजुरांनी महामोर्चा काढला. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देवून निषेध व्यक्त केला. सरकारने बांधकाम मजुरांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळातील योजनांचा बांधकाम मजुरांना थेट लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी कामगार नेते बाबा कांबळे यांनी दिली.
कष्टकरी कामगार पंचायत वतीने पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.  याप्रसंगी राम शळमारे, मल्हार काळे, मुक्तीराम जावळे, रोहित गायकवाड, भिमाशंकर शिंदे, प्रल्हाद कांबळे, धर्मराज जगताप, विक्की तामचिकर, बळीराम काकडे, लालचंद पवार, ताराचंद गोफने, समीर सय्यद आदी उपस्थित होते.
बाबा कांबळे म्हणाले की,  बांधकाम मजुरांसाठी सरकारने इमारत व इतर बांधकाम मजूर कल्याणकारी मंडळ स्थापन केले आहे. कामगार मंडळात सात हजार कोटीपेक्षा अधिक रक्कम जमा आहे. या पैशाचा उपयोग बांधकाम मजुराच्या कल्याणकारी योजनांसाठी करण्याऐवजी महाराष्ट्र शासनाने कामगार खात्या अंतर्गत एक हजार कोटींच्या निविदा काढल्या असून यात कामगारांना सेफ्टी साधन पुरविणे, मध्यान्ह भोजन देणे आदी योजनांचा सहभाग आहे, सेफ्टी साधन पुरविणे हि बिल्डरची जबाबदारी आहे. बिल्डरांनी सेफ्टी साधन पुरवावी हे त्यांना कायद्याने बंधनकारक आहे. असे असताना सरकारच्या वतीने सेफ्टी साधन देऊन बिल्डरांचा फायदा केला जात आहे.  या कामात जास्तीच्या निविदा कडून ठेकेदाराशी संगनमत करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात येत आहे.
मजुरांना बांधकाम साईटवर जाऊन मध्यान्ह भोजन देण्याच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. प्रत्येक साईटवर जाऊन मजुरांना भोजन देणे खर्चिक व वेळकाडू पणाचे आहे. मध्यान भोजन कसे आणि कोठे देणार हे शक्य नाही.  मध्यान भोजन देण्याऐवजी ज्या दराने प्रत्येक व्यक्तीची भोजनाची रक्कम ठेकेदारास दिली जाणार आहे. ती रक्कम ठेकेदारास न देता बांधकाम मजुरांच्या बैंक खात्यात जमा करावी, या पैशातून बांधकाम मजूर मध्यान व रात्रीचेही चांगले जेवण घेऊ शकतात.  यामुळे या निविदा रद्द करून बांधकाम मजुराच्या खात्यावर हे पैसे जमा करावेत, अशी मागणी कांबळे यांनी केली.
तसेच “नोंदणी झालेल्या बांधकाम मजुरांना अवजारे खरेदीसाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांचे वाटप तातडीने करण्यात यावे. बांधकाम मजुरांसाठी घरकुल योजना राबवावी , महिलांना बाळंतपनात चार महिन्याची सुट्टी देहून त्यांना चार महिन्याचे वेतन देण्यात यावे. मजुरांच्या मुलासाठी फिरत्या शाळा सुरू कराव्यात. या सहा ईतर विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर कामगार कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button