breaking-newsपिंपरी / चिंचवड

बांधकाम मजुरांच्या प्रश्नांसाठी उद्या कामगार कार्यालयावर मोर्चा 

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – बांधकाम मजुरांच्या हितासाठी काढण्यात येणारा मोर्चा मोडीत काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी बांधकाम मजुरांमध्ये गैरसमज निर्माण केले जात आहेत. हजारो कोटींचा गैरव्यवहर जनतेसमोर येऊ नये,  यासाठी हा मोर्चा दडपण्याचा सरकारचा होरा आहे. असे असले तरी, बांधकाम मजुरांचा उद्या गुरूवारी (दि. 13) पुण्यातील कामगार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे कामगारांचे नेते बाबा कांबळे यांनी म्हटले आहे.

बांधकाम मजुरांसाठी सरकारने इमारत व इतर बांधकाम मजूर कल्याणकारी मंडळ स्थापन केले आहे. मंडळात आज रोजी सात हजार कोटीपेक्षा अधिक रक्कम जमा आहे. या पैशाचा उपयोग बांधकाम मजुराच्या कल्याणकारी योजनांसाठी करण्याऐवजी महाराष्ट्र शासनाने कामगार खात्याअंतर्गत एक हजार कोटींच्या निविदा काढल्या असून यात कामगारांना सेफ्टी साधन पुरविणे, मध्यान्ह भोजन देणे, आदी योजनांचा सहभाग आहे. सेफ्टी साधन पुरविणे हि बिल्डरची जबाबदारी आहे, आणि ते आता पुरवत आहेत. मजुरांना साईटवर जाऊन मध्यान्ह भोजन कसे आणि कोठे देणार हे शक्य नाही. यामुळे एक हजार कोटी रुपये ठेकेदाराच्या घशात जाणार आहेत.

यामुळे या निविदा रद्द करून बांधकाम मजुराच्या खात्यावर हे पैसे जमा करावेत अशी मागणी कष्टकरी कामगार पंचायत वतीने बाबा कांबळे यांनी केली आहे. त्यासाठी कामगार कार्यालयावर उद्या महामोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती बाबा कांबळे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button