breaking-newsपिंपरी / चिंचवड

बांधकाम मजुरांचे कामगार कार्यालयात ठिय्या आंदोलन

पुणे –  पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये काम करत असताना 25 हून अधिक बांधकाम कामगारांचा काम करताना मृत्यू झाला आहे. बांधकाम कामगार अजूनही योजना आणि सुविधांपासून वंचित आहे. बांधकाम मजुरांच्या मागण्या मांडण्यासाठी कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने शिवाजीनगर, पुणे येथील कामगार कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार आपल्या प्रमुख मागण्यांसाठी संतप्त बांधकाम मजुरांनी पुणे शिवाजीनगर येथील कामगार कार्यलयाच्या गेटवर ठिय्या मांडत, कार्यालयाचे कामकाज बंद पाडून आपला संताप व्यक्‍त केला.

सहाय्यक कामगार आयुक्‍त पनवेलकर यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. योगिता शिंदे, आशा कांबळे प्रीती रोडे, अनिसाबी खाटीक, अप्सर शेख, अंजुबाई राठोड, उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button