breaking-newsआंतरराष्टीय

बांगलादेशच्या पंतप्रधानपदी शेख हसिना यांचा शपथविधी

ढाका – बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून शेख हसिना यांनी सोमवारी चौथ्यांदा शपथ घेतली. भीषण हिंसाचार आणि मतघोटाळ्याच्या आरोपांचे ग्रहण लागलेल्या अलीकडेच झालेल्या निवडणुकीत त्यांच्या अवामी लीग या पक्षाने प्रचंड बहुमत मिळवले होते.

बंगभवन येथे झालेल्या समारंभात अध्यक्ष मोहम्मद अब्दुल हमीद यांनी ७१ वर्षांच्या हसिना यांना पदाची शपथ दिली. हसिना या चौथ्यांदा पंतप्रधान झाल्या असून, सलग तीन वेळा या पदावर राहण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. सर्वप्रथम १९९६ साली आणि त्यानंतर २००८, २००९ व २०१४ साली त्यांनी पंतप्रधानपद भूषवले. अध्यक्षांनी यावेळी नव्या मंत्र्यांनाही शपथ दिली. हसिना यांच्या मंत्रिमंडळात २४ कॅबिनेट मंत्री, १९ राज्यमंत्री आणि तीन उपमंत्री यांचा समावेश आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात प्रामुख्याने नवे चेहरे आहेत. नव्या कॅबिनेटपैकी ३१ मंत्री पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत. काही ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. संरक्षणासारखी महत्त्वाची खाती हसिना यांनी स्वत:कडेच ठेवली आहेत.

नव्या मंत्र्यांमध्ये असदुझ्झमान खान कमाल (गृह), मोहम्मद हसन महमूद (माहिती), एएचएम मुस्तफा कमाल (अर्थ), दिपू मोनी (शिक्षण) आणि ए.के. अब्दुल मोमीन (परराष्ट्र व्यवहार) यांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button