breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बर्ड व्हॅलीसमोरील खाणीत केमिकल साहित्याला लागली आग, रहिवाशांना होतोय त्रास

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  चिंचवड येथील बर्ड व्हॅली समोरील खाणीत केमिकल वेस्ट साहित्य टाकून त्या साहित्याला आग लावण्यात आली होती.  याबाबत नागरिकांनी नगरसेवक केशव घोळवे यांच्याकडे तक्रार करुन त्या केमिकल युक्त धुराचा त्रास होवू लागल्याचे सांगितले. त्यांनी आज (शनिवारी) दुपारी अग्नीशामक दलाला पाचारण करुन त्या जवानांनी  केमिकल साहित्याला लागलेली आग विझवली.

संभाजीनगर, शाहूनगरमधील प्रभाग क्रमांक १० एचडीएफसी कॉलनी येथील रहिवाशी नागरिकांनी बर्ड व्हॅली समोरील खाणीतील केमिकल असलेले साहित्य जळत असल्याची तक्रार नगरसेवक घोळवे यांच्याकडे केली. त्या केमिकल वेस्ट धुराचा नागरिकांना खूप त्रास होवू लागला होता.

याबाबत तात्काळ महापालिका अग्नीशामक व पर्यावरण विभागाला कळवून तेथील पाहणी केली.  अग्नीशामक जवानांनी पाण्याचे फवारे मारुन ती आग विझविली. यावेळी पालिका पर्यावरण अधिकारी संजय कुलकर्णी, फायर ब्रिगेड अधिकारी, एमपीसीबी अधिकारी शिनगारे हे उपस्थित होते. दरम्यान, खाणीसमोर केमिकल वेस्ट कोणत्या कंपनीचे आहे, त्याची कसून चौकशी करावी, त्यांचेवर फाैजदारी कारवाई करावी, जेणेकरून पुन्हा असे गैरकृत्य कोणीही करणार नाही, अशा सुचना अधिका-यांना केल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button