breaking-newsआंतरराष्टीय

फ्लोरिडात इ सिगारेटच्या स्फोटात टीव्ही प्रोड्युसरचा मृत्यू

फ्लोरिडा : फ्लोरिडातील एका टीव्ही प्रोड्युसरला इ सिगारेट ओढणे चांगलेच महागात पडले आहे. इ सिगारेट ओढण्याची सवय असलेल्या या टीव्ही प्रोड्युसरचा मृत्यू या सिगारेटच्या स्फोटात झाला आहे. टलमाडगे वेकमन डी एलिया असे टीव्ही प्रोड्युसरचे नाव आहे. इ सिगारेटच्या स्फोटात तो ८० टक्के भाजला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

टलमाडगे वेकमन डी एलिया हा फ्लोरिडातील टीव्ही प्रोड्युसर आहे. इ सिगारेटच्या स्फोटामुळे मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे. त्याच्या बेडरुममध्ये या सिगारेटचा स्फोट झाला. टलमाडगे वेकमन डी एलियाने CNBC साठी प्रोड्युसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर तो फ्रि लान्स काम करत होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button