breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

फ्लॅटचे लॉक उचकटून एक कोटी लंपास; निगडी पोलिसांत नोकरावर गुन्हा दाखल

पिंपरी – फ्लॅटच्या दरवाजाचे लॉक उचकटून नोकराने घरातील सोन्याचांदीच्या दागिण्यांसह रोख रक्कम असा तब्बल एक कोटीचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना निगडीतील भक्ती-शक्ती चौकाजवळ शनिवारी (दि.16) रात्री घडली.

 

ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्याने याप्रकरणी निगडी पोलिसांनी नोकरावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विनोद बन्सल यांनी फिर्याद दिली असून नोकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

बन्सल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बन्सल यांचा भक्ती शक्ती चौकाजवळ फ्लॅट आहे. फ्लॅट बंद असताना नोकराने घरातील 80 लाखांचे सोने आणि 17 लाख 20 हजार रुपयांची रोख रक्कम असे एकूण 97 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज लंपास नेला. निगडी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button