breaking-newsक्रिडा

फोर्ड करंडक : एका षटकात चोपल्या ‘तब्बल 43’ धावा

वेलिंग्टन – न्यूझीलंडच्या फलंदाजानी एका षटकात 43 धावा करून प्रथम श्रेणीच्या क्रिकेट सामन्यात जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. फोर्ड करंडक या देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेट लढतीत नाॅर्दर्न डिस्ट्रिक्टकडून खेळताना जोए कार्टेर आणि ब्रेट हॅम्पटन या फलंदाजानी बुधवारी सेंट्रल डिस्ट्रिक्टविरूध्द  झालेल्या सामन्यात हा विक्रम रचला आहे.

सेंट्रल डिस्ट्रिक्टचा गोलंदाज विल्यम लुडिकच्या षटकांत 6 षटकार लगावले. अर्थात विल्यमने या षटकात 2 नो-बाॅलही टाकले होते.जोए आणि ब्रेट या जोडीने षटकात 4,6 (नो बाॅल),6(नोबाॅल),6,1,6,6,6 अशा एकूण 43 धावा काढल्या.

Embedded video

Northern Districts@ndcricket

4, 6+nb, 6+nb, 6, 1, 6, 6, 6
43-run over ✔️
List A world record ✔️
Congratulations Joe Carter and Brett Hampton!

1,777 people are talking about this

यापूर्वी  हा विक्रम झिम्बाब्वेच्या एल्टन चिगुम्बुराच्या नावावर होता. त्याने एका षटकात 39 धावा काढल्या होत्या. तर त्यानंतर हर्षेल गिब्जने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका षटकात 36, तर भारतीय फलंदाज युवराजसिंगने टी20 क्रिकेटमध्ये एका षटकात 36 धावा केल्या होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button