breaking-newsमहाराष्ट्र

फेसबुक लाइव्ह करत लातूरमध्ये तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

लातूरमध्ये फेसबुक लाइव्ह करत एका तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. रात्री दोनच्या सुमारास तरुणीने डास मारण्यासाठीचे ‘गुड नाइट’ हे विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. तरुणी ही आंबेडकरवादी संघटनेत सक्रीय असून वृषाली सूर्यवंशी असे त्या तरुणीचे नाव आहे.

लातूरमधील औसा रोड परिसरात राहणारी वृषाली सूर्यवंशी ही तरुणी पँथर सेनेचे काम करत होती. संघटनेतील पदावर ती कार्यरत होती. मात्र, तिने नुकताच राजीनामा दिला होता. काही लोक मला त्रास देत असल्याने मी आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे तिने फेसबुक लाइव्हमध्ये म्हटले होते. संघटनेतील काही लोकांशी तिचा वाद सुरु होता.

वृषालीचे फेसबुक लाइव्ह बघणाऱ्या काही सतर्क नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वृषालीला रुग्णालयात दाखल केले. वृषालीची प्रकृती सध्या स्थिर असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. दरम्यान, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर फेसबुकवरुन ती लिंक हटवण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button