breaking-newsक्रिडा

फिफा विश्‍वचषक: फ्रेंच फुटबॉलचेच अपत्य ठरणार फ्रान्ससाठी सर्वात मोठा धोका

  • एडेन हॅझार्डच्या करामतीकडे सर्वांचे लक्ष

सेंट पीटर्सबर्ग: इतिहासात पहिल्यांदाच विश्‍वचषक जिंकण्याची बेल्जियमला यंदा सर्वोत्तम संधी असल्याचे जाणकारांचे मत आहे. अर्थात त्यासाठी बेल्जियमला उद्या (मंगळवार) होणाऱ्या उपान्त्य लढतीत माजी विजेत्या फ्रान्सचा अडथळा दूर करावा लागेल आणि त्यानंतर अंतिम फेरीत त्यांच्यासमोर क्रोएशिया आणि इंग्लंड यांच्यातील विजयी संघाचे आव्हान राहील.

विश्‍वविजेतेपदाचे स्वप्न साकार करण्यासाठी बेल्जियमची मदार कर्णधार एडेन हॅझार्डवर आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. केविन डी ब्रुईन आणि रोमेलू लुकाकू हे आणखी दोन आघाडीवीर त्याच्याइतकेच धोकादायक आहेत. तसेच नासर चॅडली आणि मरोने फेलैनी या दोन मध्यरक्षकांनीही बेल्जियमला उपान्त्य फेरीत नेण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली आहे.

परंतु बेल्जियमच्या वाटचालीतील हॅझार्डचे योगदान निर्विवाद आहे. विशेष म्हणजे हॅझार्ड हा जगातील सर्वोत्तम फुटबॉल व्यवस्थेपैकी एक असलेल्या फ्रेंच फुटबॉलचेच अपत्य आहे. आणि आता फ्रेंच फुटबॉलची ही अप्रतिम निर्मिती आता फ्रान्स संघाच्या विश्‍वचषक विजेतेपदाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरणार आहे. फ्रान्स संघालाही त्याची जाणीव असल्यामुळे उपान्त्य लढत जेमतेम 24 तासांवर आली असताना हॅझार्डला रोखण्यासाठी काय करावे लागेल, यावर फ्रान्सच्या संघव्यवस्थापनात विचारसत्र सुरू आहे.

हॅझार्डचा इतिहासही मोठा रंजक आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो, नेमार, लियोनेल मेस्सी असे खेळाडू वैयक्‍तिक सर्वोत्तम कामगिरीबरोबरच आपापल्या देशाला विश्‍वचषख मिळवून देण्यासाठी सज्ज झाले असताना हॅझार्डने कोणताही गाजावाजा न करता चोख कामगिरी बजावील बेल्जियमला उपान्त्य फेरीत पोहोचविले. वयाच्या केवळ 27व्या वर्षी बेल्जियमचे कर्णधारपद हॅझार्डकडे सोपविणारे प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिनेझ यांना त्याच्या नेतृत्वगुणांबद्दल कोणतीही शंका नाही. हॅझार्डच्या कामगिरीतील हा सर्वोत्तम काळ असल्याचा निर्वाळा त्यांनी याआधीच दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button