breaking-newsक्रिडा

फिफा विश्‍वचषक : जपान, सेनेगलच्या चाहत्यांनी सामन्यांनंतर केली स्टेडियमची स्वच्छता

मोर्डोव्हिया – विश्‍वचषक स्पर्धेत काही देशांच्या चाहत्यांमुळे स्पर्धेला गालबोट लागत आहे तर काही देशांच्या चाहत्यांमुळे ही स्पर्धा चांगला आदर्श घालुन देत आहे. रशियायेथे होत असलेल्या स्पर्धेत मेक्‍सिकन चाहते अथवा अर्जेंटिनाच्या चाहत्यांच्या प्रतापामुळे स्थानिक नागरीक हैराण झाले होते तर जापान आणि सेनेगलच्या चाहत्यांमुळे स्थानिक नागरीकांमध्ये ते कौतुकाचा विषय ठरत आहेत. आपले चंगले विचार प्रत्यक्षात उतरवणत एखादी चांगली गोष्ट करून लोकांची मने जिंकत त्यांनी आदर्शवाद दाखवून देत समाजात आपले आणि आपल्या देशाचे नाव उंचवण्याचे काम जपान आणि सेनेगलच्या चाहत्यांनी केले आहे. त्यांनी मैदानात केलेल्या एका महत्वाच्या कामा मुळे त्यांच्यावर सोशल मीडीयातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

जपान आणि कोलंबिया यांची मोर्डोव्हिया एरेना या स्टेडियमवर एक लढत होती. ही लढत कोलंबिया जिंकेल, अशी भाकितं बऱ्याच जणांनी वर्तवली होती. पण गुणवत्ता, चिकाटी आणि अथक मेहनत करत जापानने कोलंबियाला 2-1 असे पराभूत केले. जापानच्या चाहत्यांनी विजयाचा एकच जल्लोश केला. विजयाच्या जल्लोशामध्ये काही जणांचा तोल जातो किंवा त्या उन्मादामध्ये काही जणांच्या हातून अशोभनीय कृत्यही घडतं. त्यामध्ये त्यांनी स्टेडीयममध्ये कचरा केला. मात्र ही गोष्ट लक्षात आल्यानंतर सामना संपल्यावर सगळे जपानचे चाहते आपल्या जागेवरच थांबले. बघता बघता सगळं स्टेडियम रिकामी झालं. जपानच्या प्रेक्षकांनी आपल्याकडील पिशव्या काढल्या आणि अर्ध्या पाऊण तासात सगळं स्टेडियम स्वच्छ केलं ! खाण्या-पिण्याच्या पदार्थांचे कागद, टाकलेलं अन्न, सगळं आपापल्या पिशव्यांतून भरलं, आणि एक ठिकाणी गोळा करून ठेवलं. त्यामुळे सर्व स्टेडीयम चकाचक दिसत होते.

तर सेनेगलने पोलंडला 2-1 असे पराभूत केले. या सामन्यांनंतर सेनेगलच्या चाहत्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. तुलनेने बलाढ्य असलेल्या आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केल्यानंतर जपान आणि सेनेगल या दोंन्ही देशांतही दणक्‍यात सेलिब्रेशन झाले. मात्र त्यापेक्षा लक्षवेधक ठरले ते हा सामना संपल्यानंतर सेनेगल संघाच्या चाहत्यांनी केलेल्या कौतुकास्पद उपक्रमाची या सामन्याच्या नंतर सामना पाहायला आलेल्या चाहत्यांनी जोरदार सेलिब्रेशन केले. पण त्याबरोबरच या चाहत्यांनी तेथील प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये केलेला कचरा, इकडे तिकडे फेकलेले कागद आणि इतर गोष्टींची साफसफाई केली. त्यांच्या या सामाजिक जाणिवेचे सर्वत्र कौतुक झाले. अनुभवी आणि तुलनेने बलाढ्य अशा पोलंडला पराभूत केल्यांनतर सेनेगलच्या चाहत्यांनी जोरदार विजय साजरा केला. पण त्यांनतर सामाजिक जाणिवेतून त्यांनीही स्टेडियमधील साफसफाई केली. जपान आणि सेनेगलया दोनही देशाच्या चाहत्यांनी केलेल्या या कामगिरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button