breaking-newsक्रिडा

फिफा विश्वचषक : पोर्तुगालचा मोरोक्‍कोवर संघर्षपूर्ण विजय

मॉस्को – सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला रोनाल्डोकडून गोल स्विकारल्यानंतर संपूर्ण सामन्यात वर्चस्व राखत जास्तीत जास्त वेळ चेंडू आपल्या ताब्यात ठेवत मोरोक्‍कोने पोर्तुगालला झुंजवले. मात्र रोनाल्डोच्या गोलच्या जोरावर पोर्तुगालने मोरोक्‍कोचा 1-0 असा परभव करत ब गटात आपले अव्वल स्थान राखले आहे. 

पोर्तुगाल विरुद्ध मोरक्‍को सामन्याकडे खरं तर रोनाल्डो विरुद्ध मोरोक्‍को असेच पाहिले जात होते, मात्र सामन्यात  मोरोक्‍कोच्या संघाने वर्चस्व गाजवताना पोर्तुगालच्या संघाला चांगलेच झुंजवले. ज्यात मोरोक्‍कोने सामन्याच्या संपुर्ण वेळेच्या तब्बल 57 टक्‍के वेळ चेंडू आपल्या ताब्यात ठेवत जवळपास 74 टक्‍के अचुक पासेस करत पोर्तुगालच्या संघाला चकवायचे काम केले. ज्यात मोरोक्‍कोच्या मेधी बेनारीया, खलिद खालिद बोउसैव आणि नबील दिरार, जोआओ माऊटिन्हो, पेपे सारख्या दिग्गज खेळाडूंना चेंडू मिळूच दिला नाही. मात्र त्यांना पोर्तुगाल विरुद्ध गोल करण्यात अपयश आले. संपुर्ण सामन्यात मोरोक्‍कोच्या संघाला गोल करण्याच्या तीन संधी मिळाल्या होत्या, मात्र त्यांनी चुकीचे शॉट मारून गमावल्या तर पोर्तुगालला चार वेळा गोल करण्याची संधी मिळाली मात्र त्यातील त्यांना केवळ एकच वेळेस गोल करण्यात यश मिळाले.

तत्पूर्वी, पोर्तुगालच्या दुसऱ्या सामन्यातही बोलबाला राहिला तो ख्रिस्तियानो रोनाल्डोचाच. पहिल्या सामन्यात तीन गोल करत रोनाल्डोने पोर्तुगालला पराभवापासून परावृत्त करत होते. त्यानंतर बुधवारी सुरु असलेल्या दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या सत्रात रोनाल्डोने गोल करत संघाला मोरोक्‍कोविरुद्ध आघाडी मिळवून दिली.

सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला पोर्तुगालला पेनेल्टी कॉर्नर मिळाला. या कॉर्नरवर अप्रतिम हेडर लगावत रोनाल्डोने संघासाठी पहिल्या सत्रातील एकमेव गोल केला. रोनाल्डोने एवढ्या शिफातीने हा गोल केला की मोरोक्‍कोच्या खेळाडूंनाही धक्का बसला. एकाच विश्वचषकात चार गोल करणारा तो पोर्तुगालचा गुसरा खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीतही रोनाल्डो दुसरा खेळाडू ठरला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button