breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फडतरवाडीत पाणी फाउंडेशन आणि गरुडझेप फाउंडेशनचे श्रमदान

फडतरवाडी, (महाईन्यूज) – श्रमदान सार्थकी लावण्यासाठी गरुडझेप फाउंडेशनच्या टीमने फडतरवाडीत पाणी आडवा पाणी जिरवा यासाठी कडी मेहनत घेतली. गावकर-यांनी टीमला सहकार्य करून टिमचे कौतुक केले आहे.
श्रमदानासाठी गरुडझेप संस्थेने फडतरवाडीची निवड केली. गरुडझेप संस्थेचे सदस्य श्रमदान करण्यासाठी गावात येणार म्हटल्यावर गावक-यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्यासोबत सहकार्याची भूमिका घेत श्रमदान करण्याचा त्यांनी वाटा उचलला. पाणी फाऊंडेशन आणि अमिर खान यांच्यामुळेच गरुडझेप संस्थेला श्रमदानाची संधी मिळाली. यामुळेच महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचं स्वप्न बगण्याचं धाडस करत जे तुम्ही यशस्वी पाऊल टाकलं, त्या प्रत्येक पावलांना फक्त यश आणि यशच मिळो, ही ईश्वरचरणी गरुडझेप फाउंडेशनच्या वतीने मनापासून प्रार्थना करत असल्याची भावना टिमच्या सदस्यांनी व्यक्त केली.
गावातील मंगेश नवले, निवास गायकवाड, विजयमाला पवार, माधवी शिंदे, निखिल, हर्ष, प्रवीण, खंडेराव, गिरीश, रविराज, गरुडझेप फाउंडेशनचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष पांडूरंग गरूड, उपाध्यक्ष प्रताप दातार, कल्पना भाईंगडे, राजेश दिवटे, नामदेव गरूड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button