breaking-newsपिंपरी / चिंचवड

प्लास्टिक पिशवी मागणा-या ग्राहकाला मारहाण ; पिंपरीतील घटना

पिंपरी – बेकरीच्या दुकानात खरेदीनंतर प्लास्टिक पिशवी मागितल्याच्या कारणावरून दुकानदार आणि त्याच्या साथीदारांनी एका ग्राहकाला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि.29) पिंपरीतील उद्ममनगरमध्ये घडली.

मॅनवेल झेवियर दास (वय 34, रा. मासुळकर कॉलनी, पिंपरी), असे जखमी झालेल्या ग्राहकाचे नाव आहे. त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नसुरूउदीन अलीहसन अन्सारी व इतर तिघेजण (नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सारी यांची पिंपरीतील उद्यमनगर येथे ऑव्हन फ्रेश बेकरी आहे. शुक्रवारी सकाळी मॅनवेल हे खारी आणि टोस्ट खरेदी करण्यासाठी बेकरीमध्ये आले होते. साहित्य खरेदी केल्यावर मॅनवेल यांनी साहित्य नेण्यासाठी प्लास्टिकची पिशवी मागितली. या कारणावरून त्यांच्यात जोरदार भांडण झाले. आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना सुरुवातीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले.पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button