breaking-newsपुणेमहाराष्ट्र

प्रेमभंगामुळे पुण्यातील तरूणाची आत्महत्या, मृत्यूपूर्वी लिहिले १५ पानी पत्र

प्रेमात आलेल्या अपयशामुळे तणावात असलेल्या पुण्यातील एका तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अक्षय अखिलेश्वर कुमार (वय २२) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. हडपसर येथील अमनोरा पार्क परिसरात शुक्रवारी ही घटना घडली. पोलीस अधिक तपास करत आहेत.

अक्षय हा मगरपट्टा येथील आयबीएस महाविद्यालयात व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण घेत होता. शुक्रवारी त्याने आपल्या राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. तो गेल्या काही दिवसांपासून प्रेमात आलेल्या अपयशामुळे तणावात होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. मृत्यूपूर्वी त्याने तब्बल १५ पानी पत्र लिहिले होते. त्यात त्याने आई, वडील आणि भावाची पत्रातून माफी मागितली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button