Uncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

प्रिमियर कामगारबाबत आठ दिवसात अहवाल मागवून कार्यवाही करू – संभाजी पाटील निलंगेकर

पिंपरी : असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करावी, तसेच चिंचवडच्या प्रिमियर कंपनीतील कामगारांचे प्रश्न सोडवावेत, याबाबत कामगार मंत्री  संभाजी पाटील निलंगेकर यांची आज (रविवारी) भेट घेऊन कष्टकरी संघर्ष महासंघाचे शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी आठ दिवसात अहवाल मागवून कार्यवाही करु, असे आश्वासन त्यांनी दिले . याप्रसंगी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, कार्याध्यक्ष राजू बिराजदार, उमेश डोर्ले, मधुकर वाघ, ओमप्रकाश मोरया, दिनेश राठोड, जयंत चव्हाण उमेश साळवी आदी उपस्थित होते.

प्रीमिअर कंपनीतील सर्व कामगार कंपनीच्या प्रगती साठी परिश्रम घेत आहेत,मात्र कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांचे वेतन देत नाही, मुद्दाम  सहा महिने, आठ महिने, वर्षभर   वेतन दिले जात नाही कामगारांना जाणून बुजून त्रास दिला जात आहे,कंपनीची आर्थिक स्थिती भक्कम असताना ही  वेतन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालण केले जात नाही.

वेतन न मिळाल्याने,आर्थिक विवंचनेत  कामगार सापडला आहे, कामगारची परिस्थिती नाजूक असून दोन  वेळेच्या जेवणाचे अवघड झाले आहे ,अनेकांची कर्जाची हप्ते थकलेली आहेत,कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची फीस भरणे अवघड झाले आहे , अशाप्रकारे आर्थिक विवचंनेत कामगाराना  टाकून व्यवस्थापन अन्याय करत आहे ,कामगार मंत्र्यानीं लक्ष घालून व्यवस्थापन व कामगारांची बैठक बोलावून सकारात्मक निर्णय द्यावा अशी मागणी  महासंघाने आज केली यावर आठ दिवसात कंपनी अहवाल मागवून घेऊन योग्य कार्यवाही करू असे आश्वासन कामगार मंत्र्यानीं दिले.

दरम्यान, असंघटित कामगारांचे असुरक्षित जीवन व कामगारांचे वाढते अपघाती मृत्यू याकडे काशिनाथ नखाते यांनी कामगार मंत्र्याचे लक्ष वेधले. राज्यातील असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या १२२ घटाकातील कामगारांसाठी सुरक्षा व योग्य न्याय देण्याचे दृष्टीने  एकच महामंडळ असावे, म्हणून शासनाकडे पाठपुरावा  सुरु आहे. या वर्षी आझाद मैदानावर मोर्चा व निवेदनाद्वारे मागणी केली , मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर शासनाने घोषणा केली. मात्र पुढे कार्यवाही झालेली नाही,  त्यांची पुर्तता करावी, अशी मागणीही यावेळी केली, यावर शासन महामंडळावर सकारात्मक असून  त्याचा मसुदा तयार केला असून लवकरच महामंडळ जाहीर करून कामकाज सुरु करू, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button