breaking-newsमनोरंजन

प्रत्येक धर्मात दहशतवादी – कमल हासन

अभिनेता आणि मक्कल निधी मियाम पक्षाचे अध्यक्ष कमल हासन यांनी काही दिवसांपूर्वी ‘नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता,’ असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरांमधून टीकेची झोड उठली होती. त्यानंतर आता ‘प्रत्येक धर्मामध्ये दहशतवादी असतो’, असं वक्तव्य करत कमल हासन यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

“दहशतवाद प्रत्येक धर्मामध्ये असतो. इतिहासामध्ये असे अनेक दहशतवादी आहेत जे वेगवेगळ्या धर्मांचे आहेत. मीदेखील हेच सांगायचा प्रयत्न करत होतो. प्रत्येक धर्मामध्ये दहशतवादी असतो. त्यामुळे आपण कोणत्याही जाती-धर्मावर आरोप-प्रत्यारोप करु शकत नाही. अमूक एक धर्म आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, किंवा नीच आहे असं आपण म्हणून शकत नाही. इतकंच नाही तर प्रत्येक धर्मामध्ये दहशतवाद असतो याला इतिहास साक्ष आहे. त्या दिवशीदेखील मी हाच मुद्दा मांडायचा प्रयत्न करत होतो”, असं कमल हासन यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितलं.

View image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Kamal Haasan on stones thrown at his rally in Trichy: I feel the quality of polity is going down. I don’t feel threatened. Every religion has their own terrorist, we cannot claim that we are sanctimonious. History shows that all religions have their extremists.

100 people are talking about this

दरम्यान, चेन्नईतील अर्वाकुरची इथल्या प्रचारावेळी कमल हासन यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर भाषण केलं होतं. यावेळी ”स्वतंत्र भारतात पहिला दहशतवादी हिंदू. त्याचं नाव नथुराम गोडसे,” असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपा आणि शिवसेनेने तीव्र शब्दात निषेध नोंदविला होता. इतकंच नाही तर अखिल भारतीय हिंदू महासभेनेदेखील संताप व्यक्त करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button