breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रचार दौरा सोडून डॉ. अमोल कोल्हे शिवज्योत रॅलीत झाले सहभागी

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार डॉ. अमोल कोल्हे हे सध्या प्रचारात व्यस्त आहेत. शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती साजरी होत असून पुणे-आळंदी मार्गावरून प्रचारासाठी जात असताना डॉ. अमोल कोल्हे यांना काही शिवप्रेमी तरुण शिवज्योत रॅलीत सहभागी झाल्याचे दिसले. रॅली दिसताच अमोल कोल्हे वेळ न दवडता त्यात सहभागी झाले. स्वतः च्या हातात शिवज्योत घेऊन कोल्हे हे अनवाणी पायाने धावले.

डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून लोकप्रियता मिळवली असून नुकताच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीने त्यांना शिरूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देखील दिली आहे. शनिवारी प्रचारासाठी जाताना अमोल कोल्हे यांना शिवज्योत रॅली दिसली आणि ते देखील या रॅलीत सहभागी झाले. अमोल कोल्हे सहभागी होताच शिवप्रेमींनी एकच जल्लोष करत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा दिल्या.

शिवज्योत रॅलीत सहभागी झाल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सकाळी पुणे- आळंदी मार्गावरून जात असताना शिवप्रेमी तरुणांनी काढलेली शिवज्योत रॅली दिसली आणि माझे पाय आपोआप रॅलीकडे वळाले. थोड्या अंतरासाठी मीही रॅलीमध्ये सहभागी झालो, काही पावले महाराजांच्या तरुण मावळ्यांसोबत धावल्याचे समाधान मिळाले. महाराजांचे आपल्यावर असणारे ऋण तर कधी फिटणारे नाही. या महाराष्ट्राच्या मातीला महाराजांनी शिकवलेला अभिमान आणि स्वबळावरचा विश्वास यावर आधुनिक महाराष्ट्र आजही उभा आहे. माझ्या वतीने मी ज्यांचे विचार, कर्तृत्व आणि मुल्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो, त्या छत्रपती शिवाजी महाराज यांना मी त्यांच्या जयंतीनिमित्त शतशः नमन करतो, असे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button