breaking-newsपुणे

पोस्ट पेमेंट बॅंकेचा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे – केंद्र शासनाच्या वतीने देशभर सुरू करण्यात आलेल्या पोस्टल बॅंकेच्या पोस्ट पेमेंट बॅंकेचा शुभारंभ केंद्रिय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झाला. यावेळी उपस्थितांना योजनेची माहिती समजावून सांगण्यात आली.

महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आधारकार्ड वापरून काही मिनिटांमध्ये ग्राहकांना या सेवेचा लाभ घेणे शक्‍य होणार आहे. इंडिया पेमेंट पोस्ट बॅंक ही भारतातील सर्वात सुलभ बॅंक असणार आहे. देशभरातील दीड लाख पोस्टांची कार्यालये आणि तीन लाखांपेक्षाही अधिक पोस्टमन ही सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविणार आहेत. देशभरातील साडेसहाशे जिल्हा मुख्यालये, शाखा आणि देशभरातील इतर साडेतीन हजार सेवांचे शनिवारी उद्‌घाटन करण्यात आले

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button