breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पोलीस आयुक्तालयाच्या जागेचा विषय मार्गी; महासभेची मान्यता

पिंपरी – गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेले स्वतंत्र नवीन पोलीस आयुक्तालय चिंचवडच्या प्रेमलोक पार्क मधील महात्मा फुले शाळेच्या इमारतीमध्येच होणार अहे. त्यासाठी शाळेची इमारत पोलिसांना भाडे तत्वावर देण्यासाठीच्या विषयाला आज शुक्रवारी (दि. 20) महासभेने मान्यता दिली आहे.

 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मंत्रीमंडळाच्या 10 एप्रिल 2018 रोजी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विविध कक्षांसाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या एकूण चार हजार 840 पदांची आवश्यकता आहे. त्यापैकी पुणे पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीणकडून दोन हजार 207 पदे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडे वर्ग करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 60 टक्के, त्यानंतर दोन वर्षांनी दुस-या टप्प्यात 20 टक्के आणि त्यानंतर दोन वर्षांनी तिस-या टप्प्यात 20 टक्के पदे भरली जाणार आहेत. पोलीस आयुक्तालयाबाबतचा अध्यादेश देखील नुकताच पारित करण्यात आला आहे. तसेच, पोलीस आयुक्तलायासाठी पोलीस निरीक्षकांच्या बदल्या देखील करण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी पोलीस आयुक्तालय सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी प्रशासकीय कार्यवाही वेगात सुरु आहे.

 

चिंचवड, प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले शाळेची इमारत आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी निश्चित करण्यात आली आहे. या शाळेची इमारत प्रशस्त आहे. ग्राऊंड फ्लोअर, दोन मजले, भुखंडाचे क्षेत्रफळ एकूण 4427.50 चौरस मीटर आहे. तळमजला 761.84 चौरस मीटर आहे. पहिला मजला 731.29 तर दुसरा मजला 712.00 चौरस मीटर आहे. शाळेसमोरील मोकळ्या मैदानाचे क्षेत्रफळ 3665.16 चौरस मीटर आहे. प्रत्येक मजल्यावर सात वर्ग खोल्या आणि एक सभागृह आहे. ही जागा पोलीस आयुक्तालयासाठी देण्यास महासभेने मान्यता दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button