पोलिसांच्या पत्नींचा बापट यांच्या निवासस्थानावर हंडा मोर्चा
पुणे : शिवाजीनगर पोलिस वसाहतीमध्ये तीन दिवसांपासून पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत संतप्त महिलांनी पालकमंत्री गिरिश बापट यांच्या निवासस्थानावर आज सकाळी हंडा मोर्चा काढला. शिवाजीनगर पोलिस वसाहतीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे.
मागील 2 महिन्यात 3 वेळा मोर्चा काढला. परंतू तरी याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. गेल्या तीन दिवसांपासून शिवाजीनगर पोलिस वसाहतीत पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाण्याचे टॅंकर पण येत नसल्य़ामुळे रहिवाशांची गैरसोय होत आहे. आज अखेर संतप्त महिलानी पालकमंत्री गिरिश बापट यांच्या निवासस्थानावर हंडा मोर्चा काढला. गिरीश बापट यांच्यासमोर पाण्याच्या विषयावर संतप्त होत जाब विचारला. यावेळी बापट यांनी महिलांशी संवाद साधून निघुन गेले. महिलांचे गाऱ्हाणे एकुण न घेतल्यााने नाराज महिलांनी पाण्यासाठी शिवाजीनगर परीसरात रस्ता रोको आंदोलन सुरु केले आहे.