breaking-newsराष्ट्रिय

पोलिसच अपहरणकर्ते, गुन्हेगाराच्या पत्नीकडे मागितली दीड कोटीची खंडणी

पोलीस नेहमी गुन्हेगाराला पकडण्याचे काम करतात पण दिल्लीमध्ये बिलकुल याउलट घटना घडली आहे. दिल्लीच्या रानहोला पोलीस स्टेशनमध्ये तैनात असलेल्या तीन पोलिसांनीच एका गुन्हेगाराचे अपहरण करुन त्याच्या सुटकेसाठी पत्नीकडे दीडकोटी रुपयाची खंडणी मागितल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

या तिन्ही पोलिसांना दोन दिवसांपूर्वी मयुरा एनक्लेव्ह भागातून अटक करण्यात आली आहे. या अपहरणात सहभागी असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुबे सिंह, हेड कॉन्स्टेबल इंदू पावात आणि कॉन्स्टेबल अजय कुमार यांना दिल्ली पोलीस सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्यात आले आहे.

ANI

@ANI

Delhi: Assistant Sub-Inspector Sube Singh, Head Constable Indu Pawat&Constable Ajay Kumar posted at Ranhola ps dismissed from service with immediate effect for allegedly abducting a man & demanding Rs 1.5 cr as ransom from his wife. They were arrested from Maurya Enclave on Dec 4

60 people are talking about this

या तिन्ही पोलिसांविरोधात अपहरण आणि खंडणीच्या कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आम्ही असे चुकीचे प्रकार अजिबात खपवून घेणार नाही. आम्ही तिघांना अटक केली आहे दिल्ली दक्षिण रेंजचे पोलीस अधिकारी आर.पी.उपाध्याय यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button