breaking-newsक्रिडा

पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाची डेन्मार्कवर 3-2 ने मात

निझनी नोव्होगोरोड: फिफा वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी करत क्रोएशियाची विजयी वाटचाल सुरुच असून पेनल्टी शूटआऊटमध्ये डेन्मार्कवर मात करत क्रोएशियाने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाने डेन्मार्कवर ३-२ असा विजय मिळवला असून उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाचा सामना यजमान रशियाशी होणार आहे.
हा सामना सुरु झाल्या झाल्या पहिल्या एका मिनिटातच डेन्मार्कच्या जोर्गनसनने गोल करत मुसंडी मारली. डेन्मार्कने गोल केल्यानंतर अवघ्या तीनच मिनिटांत क्रोएशियाच्या मान्डझुकिझने गोल केला. त्यानंतर दोन्ही देशांच्या खेळाडूंनी निकराचा लढा दिला. क्रोएशियाच्या गोलकिपरने एक डेन्मार्कचा गोल करण्याचा प्रयत्न फोल ठरवला. त्यानंतर निर्धारीत वेळ संपेपर्यंत क्रोएशिया किंवा डेन्मार्कला एकही गोल करत आला नाही. अखेर वेळ संपल्यावर ३० मिनिटांनी वेळ वाढवण्यात आली. पण वाढवलेल्या वेळातही दोन्ही संघापैकी कोणीच गोल केला नाही. १२० मिनिटांचा खेळ संपल्यानंतर मग सामन्याचा निर्णय लावण्यासाठी पेनल्टी किक ला सुरुवात झाली. दोन्ही संघांना ५-५ पेनाल्टी किक मारण्याची संधी दिली गेली.यात क्रोएशियाने ३ गोल केले तर डेन्मार्कने २च गोल केले.

तत्पूर्वी, क्रोएशियाने साखळीतील तीनही सामने जिंकून बाद फेरीत प्रवेश केल्याने संघाचे पारडे जड होते. तर १९९८ नंतर पुन्हा एकदा बाद फेरीचा अडथळा ओलांडण्यास डेन्मार्कचा संघ उत्सुक होता. सामन्यात दोन्ही संघांची सुरुवात आक्रमक होती. पहिल्याच मिनिटाला डेन्मार्कने गोल मारुन १-० अशी आघाडी मिळवली. त्यांच्या जोर्गनसनने हा गोल मारला. पण क्रोएशियातर्फे मारियो मेंडझुकिझने चौथ्याच मिनिटाला गोल मारुन संघाला बरोबरी मिळवून दिली. यानंतर संपुर्ण वेळेत दोन्ही संघाला गोल करण्यात अपयश आले. दुसऱ्या हाफमध्ये डेन्मार्कला आणखी एक गोल करण्याची संधी मिळाली होती मात्र क्रोएशियाच्या गोलकिपरने हा प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे निर्धारित वेळेत सामना १-१ बरोबरीत राहिला. त्यानंतर अतिरिक्त वेळेत दोन्ही संघांनी अनेक प्रय्त्न करूनही गोल बरोबरी कायम राहिल्याने हा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये पोहोचला. अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाने डेन्मार्कवर ३-२ विजय मिळवला. क्रोएशियाचा गोलकिपर सुबासिच हा विजयाचा शिल्पकार ठरला.

अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात विजय मिळवून क्रोएशियाने उपांत्यपूर्व फेरीत जागा बनवली आहे तर डेन्मार्कचा संघ मात्र फिफा वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. दरम्यान स्पेन आणि रशियामध्ये झालेल्या सामन्यात रशियाने स्पेनला हरवून उपांत्यपूर्व फेरीत जागा बनवली. तर विश्वचषकाचा प्रबळ दावेदार समजला जाणारा स्पेन मात्र स्पर्धेबाहेर पडला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button