breaking-newsपुणे

पेड मुलाखत’ देऊन सव्वाशे कोटी जनतेची दिशाभूल – सचिन साठे

पिंपरी- भाजपाचे केंद्र व राज्य सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहे. देशातील बेरोजगारी आणि कायदा सुव्यवस्थेबाबत दिलेले एकही आश्वासन चार वर्षात पुर्ण करता आले नाही. देशभर उडलेला कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, शंभरीकडे वेगाने वाटचाल करणारे पेट्रोलचे दर, केद्रींय अधिवेशन चालविण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात जाऊन ‘पेड मुलाखत’ देऊन सव्वाशे कोटी जनतेची व माध्यमांची दिशाभूल करीत आहे. अशी टिका शहर जिल्हा कॉंग्रेस पक्षाचे  अध्यक्ष सचिन साठे यांनी केली.
शहर कॉंग्रेस पक्षाची बैठक  आज रविवारी (दि. 22) संततुकाराम नगर पिंपरी येथे घेण्यात आली. यावेळी लोक जनशक्ती पार्टीच्या पुणे जिल्हा अध्यक्षा सरिता सुनिल जामनिक, भारिप बहुजन महासंघाचे संघटक सचिव बाबूलाल वाघमारे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. या बैठकीस कॉंग्रेस प्रदेश सदस्य संग्राम तावडे, बिंदू  तिवारी, राजेंद्रसिंह वालिया, ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, शहर पदाधिकारी हुरबानो शेख, विनिता तिवारी, क्षितीज गायकवाड, लक्ष्मण रुपनर, तानाजी काटे, सुनिल राऊत, दिलीप पांढरकर, भाऊसाहेब मुगुटमल, वसंत मोरे, सज्जी वर्की, राजन नायर, बाबा बनसोडे, किशोर कळसकर, वामन ऐनिले, सतिश भोसले, युवकचे नरेंद्र बनसोडे, मयुर जयस्वाल, विशाल कसबे, हिरा जाधव, विरेंद्र गायकवाड, तुषार पाटील, रहिम खान, ईषाद अली, आनंदराव फडतरे, आबा खराडे, विश्वनाथ खंडाळे, बाबूलाल वाघमारे, दिपक जाधव, भास्कर नारखेडे, चंद्रशेखर जाधव, विष्णु खरे आदी उपस्थित होते.
साठे म्हणाले की, एक वर्षापुर्वी स्थानिक निवडणूकीमध्ये भाजपाने शहरातील अनधिकृत बांधकाम प्रश्न, शास्तीकर हटविणे, चोविसतास स्वच्छ मुबलक पाणीपुरवठा करणे, बीआरटी सुरु करणे अशी आश्वासने दिली होती. ती पुर्ण करण्याऐवजी उलट मिळकत धारकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मिळकत करात व पाणीपट्टीत अन्यायकारक दर वाढ केली आहे. पवना धरणातून बंद जलवाहिनीव्दारे शहराला पाणी देण्याऐवजी रात्री अपरात्री कमी दाबाने व तासभरच पाणीपुरवठा केला जातो. यामुळे महिला भगिनी त्रस्त झाल्या आहेत. ही  भाजप सेनेची चुकीची अन्यायकारक धोरणे जनतेसमोर मांडण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) कॉंग्रेसच्या वतीने 1 मे 2018 पासून वॉर्डस्तरीय जनसंवाद बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांमध्ये कॉंग्रेसच्या सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित राहतील. अशी माहिती साठे यांनी दिली.
स्वागत विनिता तिवारी, सुत्रसंचालन मयुर जयस्वाल आणि आभार नरेंद्र बनसोडे यांनी मानले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button