breaking-newsमनोरंजन

पूजा बत्राने सलमानच्या सहकलाकारासोबत केले लग्न, पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री पूजा बत्रा कोणताही गाजावाजा न करता विवाहबंधनात अडकल्याचे वृत्त गेल्या आठवड्यात समोर आले. त्यानंतर आता पूजाने सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहे. सलमान खानच्या चित्रपटांमध्ये सहकलाकाराची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता नवाब शाहशी तिने लग्नगाठ बांधली आहे.

पूजा कधीकाळी बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक मानली जायची. 2002 मध्ये पूजाने डॉक्टर सोनू अहलूवालियासोबत लग्न केलं आणि ती अमेरिकेला जाऊन स्थायिक झाली. 9 वर्षांच्या संसारानंतर त्यांचा घटस्फोट झाला आणि ती भारतात परत आली. आता तिने नवाब शाहसोबत दुसरे लग्न केले आहे.

पूजा व नवाब बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. पूजाने ‘विरासत’, ‘नायक’, ‘हसीना मान जाएगी’, ‘भाई’, ‘फर्ज’ आणि ‘एबीसीडी 2’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. नवाब शाहनेदेखील ‘भाग मिल्खा भाग’, ‘डॉन 2’, ‘दिलवाले’, ‘टाइगर जिंदा है’ यांसह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये सपोर्टिंग रोलमध्ये काम केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button