breaking-newsराष्ट्रिय

पुलवामातून अपहृत जवानाचा मृतदेह सापडला

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामातून अपहरण केलेल्या भारतीय जवानाची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. औरंगजेब असं या जवानाचे नाव आहे. पुलवामातील गुसू या भागात औरंगजेब यांचा मृतदेह आढळून आला. औरंगजेब हे हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर समीर टायगरला कंठस्नान घातलेल्या कमांडो ग्रुपचा सदस्य होते.

औरंगजेब हे 44 राष्ट्रीय रायफल्सचे जवान असून त्यांची पोस्टिंग 44RR शादीमार्गमध्ये होती. ईदच्या सुट्टीसाठी घरी परतताना, दहशतवाद्यांनी मुघल रोडवर त्यांचे अपहरण केले. औरंगजेब हे अँटी-टेरर ग्रुपचे सदस्य आहेत.
औरंगजेब सकाळी नऊच्या सुमारास एका खासगी वाहनातून शोपियांच्या दिशेने येत होते. त्यावेळी कलमपोराजवळ अतिरेक्यांनी वाहन अडवलं आणि त्यांचे अपहरण केले.

ज्येष्ठ पत्रकार आणि ‘रायझिंग काश्मिर’चे संपादक शुजात बुखारी यांचीही गोळी झाडून हत्या करण्यात आली. श्रीनगरमधील वृत्तपत्र कार्यालयाबाहेर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी बुखारींवर गोळीबार केला. इफ्तार पार्टीत सहभागी होण्यासाठी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास बुखारी हे लाल चौकातील प्रेस एन्क्लेव्हमध्ये असलेल्या कार्यालयातून निघाले होते. बुखारी गाडीत बसताना काही जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button