breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीपुणे

पुण्यात 9 जानेवारीपासून ‘खेलो इंडिया’ स्पर्धा

दिल्ली – महाराष्ट्राला मिळालेल्या यजमान पदाचे सोने करू या ; सगळ्या खेळाडूंचे स्वागत करू या, अशा शब्दांत 9 जानेवारी 2019 पासून सुरू होणाऱ्या ‘खेलो इंडिया-2019’ शालेय क्रीडा स्पर्धेचे यजमान पद महाराष्ट्राला घोषित झाल्यानंतर क्रीडा व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी ही प्रतिक्रिया रविवारी येथे दिली.

नवी दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये ‘खेलो इंडिया’ 2019 च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राला खेलो इंडियाचे यजमान पद मिळाल्याचे जाहीर केले. या कार्यक्रमात केंद्रीय युवा व क्रीडा राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) कर्नल राज्यवर्धन राठोड, महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री विनोद तावडे, व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. खेलो इंडिया -2019 हा कार्यक्रम भारतीय क्रीडा प्राधिकरण, केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालय, महाराष्ट्र शासन आणि स्पोर्टस् इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात आयोजित होणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button