breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पुण्यात महिला पोलिसांकडून दोन महिलांना अमानुषपणे मारहाण (VIDEO)

पुणे, (महाईन्यूज) – हडपसर येथील मगरपट्टा रस्त्यावर अतिक्रमण विभागाकडून अतिक्रमण कारवाई करण्यात आली. कारवाईला विरोध करताना दोन सर्वसामान्य महिलांना महिला पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली आहे. त्यामध्ये एक ज्येष्ठ महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या अमानुषपणे केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या निष्पाप महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

https://youtu.be/kCUhZ7dDe48

याबाबत पुणे महापालिका अतिक्रमण विभागाकडून अशी माहिती मिळाली की, शहरातील अनेक भागात अतिक्रमण विभागाकडून दररोज कारवाई केली जाते. त्यादरम्यान नागरिकांसोबत वादाचे प्रकार घडत असतात. हे वाद टाळण्यासाठी आम्ही पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करीत असतो. अशाच प्रकारे दोन दिवसांपूर्वी मगरपट्टा रोडवर ही अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली. यावेळी ही घटना घडली.

वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या येथील एका चहाच्या स्टॉलवर अतिक्रमण विभागाचे लोक कारवाई करीत असताना. हा स्टॉल चालवणाऱ्या सासू आणि सूनेने या कारवाईला विरोध केला तसेच त्यांची महिला पोलिसांसोबत वादवादीही झाली. त्यानंतर महिला पोलीस या दोघींनाही पोलीस व्हॅनमध्ये बसवत असताना त्यांनी विरोध केला आणि पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अंगावर धाऊन गेल्या. तसेच त्यांनी पोलिसांवर दगडही फेकले. त्यामुळे पोलिसांनी आपल्या बचावासाठी हा पवित्रा घेतला.

या प्रकरणी मारहाण झालेल्या स्टॉलधारक सासू-सुनेवर मुंढवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना नंतर न्यायालयातही हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने या महिलांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button