breaking-newsक्रिडापुणे

पुणे लीग कबड्डी स्पर्धेसाठी रविवारी निवड चाचणी

पुणे: महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना, तसेच पुणे जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बाणेर-बालेवाडी-पाषाण, प्रभाग क्र. 9 राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पुणे लीग कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या मान्यतेने होणारी ही स्पर्धा 19 ते 22 जुलै या कालावधीत बालेवाडी येथील श्रीशिवछत्रपती क्रीडानगरीतील बॉक्‍सिंग संकुलात रंगणार आहे.

पुरुष व महिला गटात मॅटवर रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा कबड्डी संघटनेशी संलग्न असलेल्या संस्थांमधील पुरुष व महिला खेळाडूंची निवड चाचणी येत्या रविवार, दिनांक 8 जुलै रोजी श्रीशिवछत्रपती क्रीडानगरीतील वेटलिफ्टिंग संकुलात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती स्पर्धेचे मुख्य आयोजक व नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी दिली.
या चाचणीसाठी प्रत्येक संघाने आपल्या कमाल पाच खेळाडूंची नावे लेटरहेडवर व अध्यक्षांच्या सहीशिक्‍क्‍यासह पाठविणे आवश्‍यक आहे, असे चांदेरे यांनी स्पष्ट केले. निवड चाचणीला उपस्थित राहणाऱ्या खेळाडूंचाच स्पर्धेसाठी विचार करण्यात येणार आहे. निवड चाचणीसाठी निवड समिती सदस्य म्हणून आत्माराम कदम, दत्ता कळमकर, किरण चांदेरे व सचिन शिंदे काम पाहणार असून नियंत्रक म्हणून मधुकर नलावडे, शकुंतला खटावकर, बलराज वाडेकर, भाऊ करपे आणि दत्ता झिंजुर्डे यांची समिती नियुक्‍त करण्यात आली असल्याचेही बाबूराव चांदेरे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button