breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुणे-मुंबई महामार्गावर वाहने सुसाट ; वेगमर्यादा 20 किमीने वाढवण्यास सरकारचा “ग्रीन सिग्नल’

पुणे – पुणे – मुंबई महामार्गावर (एक्‍स्प्रेस वे) आता वाहने सुसाट चालविण्यासाठी “ग्रीन सिग्नल’ मिळाला. नुकत्याच काढण्यात आलेल्या आदेशानुसार, महामार्गावर वाहनांची वेगमर्यादा सुमारे 20 किमीने वाढविण्यात आली आहे. आता पुणे-मुंबई महामार्गावर चारचाकी वाहनाचा (फोर व्हीलर) वेग 120 किमी ठेवता येणार आहे. तर बसेससाठी 100 किमी आणि अवजड वाहनांना 80 किमी ठेवता येणार आहे. कारचा पूर्वीचा तासी वेग 100 होता.

द्रुतगती मार्गावर असणाऱ्या वाहनमर्यादेचे वारंवार उल्लंघन केले जात होते. त्यामुळे अपघातांमध्ये देखील वाढ झाली होती. अपघातांचे मुख्य कारण वाहनांचा अतिवेग असल्याने अनेक काळापासून वेगमर्यादा वाढविण्यात आली नव्हती. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वाहनाचा वेग वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस केली होती. यानुसार केंद्रीय मंत्रालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे “एक्‍स्प्रेस वे’वर गाडी “सुसाट’ चालविण्याचा मार्ग मोकळा झाला असला, तरी वाहनचालकांनी महामार्गावरील वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

बाजारामध्ये नव्याने येणाऱ्या गाड्यांच्या परिस्थितीचा विचार करूनच हा निर्णय देण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी देखील करण्यात येत आहे. अतिवेगातील वाहनांवर यानुसारच कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, वेगमर्यादेसह नागरिकांना “लेन’च्या नियमांचे देखील पालन करणे आवश्‍यक आहे.
– मिलिंद मोहिते, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button