breaking-newsपुणे
पुणे ते लोणावळा दरम्यान रेल्वेचा ब्लॉक
पुणे – पुणे विभागांतर्गत येणाऱ्या पुणे ते लोणावळा लोहमार्गावरील कामशेतजवळ मंगळवारपासून (दि.3) ते 7 जुलैपर्यंत देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक ठेवण्यात आला आहे. या दरम्यान दुपारी 1.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार असल्याने पुणे-लोणावळा-पुणे दरम्यान धावणाऱ्या दोन लोकल चारही दिवस रद्द करण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रसासनाच्यावतीने देण्यात आली.
ब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात आल्या असून काही लोकल अंशतः रद्द केल्या आहेत. पुण्याहून लोणावळ्याकरीता दुपारी 12.15 वाजता सुटणारी तर लोणावळ्याहून पुण्याला दुपारी 2.50 वाजता सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, पुण्याहून लोणावळ्याला दुपारी 1 वाजता सुटणारी लोकल व लोणावळा येथून पुण्याकरिता दुपारी 2 वाजता सुटणारी लोकल तळेगाव ते लोणावळा दरम्यान रद्द करण्यात येणार आहे.