breaking-newsपुणेमहाराष्ट्रराष्ट्रिय

पुणे आणि बारामतीचा गड आम्हीच राखणार, आघाडीच्या नेत्यांचा विश्वास

यंदा पुणे लोकसभा मतदारसंघात 49.84 टक्के आणि बारामती लोकसभा मतदारसंघात 61.54 टक्के इतके मतदान झाले आहे. तसेच 2014 च्या निवडणुकीत अनुक्रमे 54.11 टक्के आणि 58.81 टक्के असे मतदान झाले होते. या दोन्ही निवडणुकीची आकडेवारी लक्षात घेता. पुण्यात मतदान कमी आणि बारामतीमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर महायुती आणि आघाडीच्या काही नेत्याशी या बाबत संवाद साधला असता. आजवर झालेल्या निवडणूकीच्या आकडेवारीवरून आम्हीच पुणे आणि बारामतीचा गड राखणार असल्याचा विश्वास आघाडीच्या नेत्याकडून व्यक्त करण्यात आला.

देशात झालेल्या 2014 च्या निवडणुकीत भाजप ला जनतेने स्पष्ट बहुमत देत. सत्ता स्थापन करण्याची संधी दिली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती देशाचा कारभार आल्यावर अनेक योजना सर्व सामान्य नागरिकांच्यासाठी आणल्या. पण या योजना शेवटच्या घटकापर्यन्त पोहचविण्यात हे सरकार अपयश ठरले. अनेक योजनामध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप मागील पाच वर्षात विरोधकांकडून करण्यात आल्याच्या अनेक घडामोडी जनतेने पाहिल्या आहे. त्या पाच वर्षाच्या काळात काही राज्याच्या झालेल्या निवडणुका दरम्यान काही ठिकाणी भाजपला, तर काही ठिकाणी काँग्रेस ला यश आल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे भाजपला नागरिकांनी सर्वाधिक मतदान केले. मात्र यंदा भाजपला मतदान 2014 पेक्षा कमी होणार असल्याचे अनेक राजकीय विश्लेषण करणार्‍या जानकर व्यक्तीकडून देखील जाहीरपणे सांगण्यात आले.

त्याच दरम्यान देशभरात लोकसभा निवडणुकीला देखील सुरुवात झाली. 2014 च्या निवडणुकी पेक्षा यंदा मतदान करण्यास नागरिक बाहेर पडत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहण्यास मिळाले. पण काल देशभरात झालेल्या तिसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीत पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता. यंदा पुण्यात मतदान कमी आणि बारामतीमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
त्या अगोदर 2014 साली झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण 9 लाख 93 हजार 278 नागरिकांनी मतदान केले होते. एकूण 54.11 टक्के इतके मतदान झाले होते. महायुतीचे उमदेवार अनिल शिरोळे यांना 5 लाख 69 हजार 825 मते मिळाली होती. तर काँग्रेस पक्षाचे विश्वजीत कदम यांना 2 लाख 54 हजार 56 इतके मतदान झाले आणि नोटा मतदानास 6 हजार 438 नागरिकांनी पसंती दिली होती. या निवडणुकीत अनिल शिरोळे हे 3 लाख 15 हजार 769 मतांनी विजयी झाले होते.

मागील पाच वर्षात देशभरात अनेक राजकीय घडामोडी घडल्या तशा पुण्यात देखील घडल्या आहेत. या बाबत सांगायचे झाल्यास यंदा 2019 च्या निवडणुकीसाठी भाजपकडून पालकमंत्री गिरीश बापट, राज्यसभा खासदार संजय काकडे, नगरसेवक मुरलीधर मोहोळ हे इच्छुक होते. 2014 च्या निवडणुकीत निवडून आलेले अनिल शिरोळे यांचा पत्ता कट होत. पालकमंत्री गिरीश बापट यांना संधी देण्यात आली. ज्या प्रकारे भाजपमध्ये उमेदवारी देण्यावरून घडामोडी घडल्या. अशीच काही घडामोडी काँग्रेस मध्ये देखील घडल्या. पुण्याच्या जागेसाठी महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे, जेष्ठ नेते मोहन जोशी, शेकापचे नेते प्रविण गायकवाड हे देखील इच्छुक होते. मात्र या तिघांमध्ये ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांना संधी देण्यात आली.

अखेर आघाडीकडून मोहन जोशी आणि महायुतीकडून पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवार अर्ज भरल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचार सभा आणि रॅलीला सुरुवात झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शहरात हजेरी लावत सत्ताधारी भाजपचा आरोप प्रत्यारोपच्या माध्यमांतून भांडाफोड करण्याचा प्रयत्न देखील केला. रविवारी सायंकाळी सहा वाजता प्रचाराचा तोफा थंडावल्या. यानंतर काल पुणे लोकसभेसाठी 49.84 टक्के आणि 2014 च्या निवडणुकीत 54.11 टक्के इतके मतदान झाले. या आकडेवारी वरून 2014 च्या तुलनेत चार टक्क्यांनी मतदान कमी झाले आहे. यामुळे याचा परिणाम सत्ताधारी भाजप विरोधात असणार की विरोधी बाकावर असणार्‍या काँग्रेस च्या बाजूने असणार आहे.

तर या मतदानाच्या आकडेवारी वरुन नेमके पुण्याच्या राजकारणा बाबत भाजपचे पुणे शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांच्याशी संवाद साधला असता. ते म्हणाले की, मागील निवडणुकीत भाजपला पुणेकर नागरिकांना भरभरून मतदान केले. त्याप्रमाणे यंदा देखील मतदान केले आहे. मतदानाची आकडेवारी जरी कमी दिसत असली तरी भाजपचा मतदार बाजूला गेला नाही. आमचा उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येईल असे त्यांनी सांगितले.  यावर आघाडीकडून काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतील पक्ष नेते शरद रणपिसे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, मागील निवडणुकीत नागरिकांनी भाजपला मतदान केले. पण पाच वर्षात सत्ताधारी भाजपने काम केले नसल्याने याचा परिणाम मतदानावर झाला आहे. त्यामुळे पुण्यातील जागा काँग्रेस जिंकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे लोकसभा मतदारसंघाच्या बाजूचा बारामती मतदारसंघ येतो. या मतदारसंघातून 2014 साली सुप्रिया सुळे या आघाडीकडून उमेदवार म्हणून होत्या. तर महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे उमेदवार होते. त्यामुळे दोन्ही लोकप्रतिनिधीमध्ये चुरस होणार हे सुरुवातीपासून मानले जात होते. त्या अंदाजानुसार 2014 ची निवडणूक देखील झाली. त्यावेळी 10 लाख 66 हजार 556 व्यक्तीनी मतदान केले. 58.81% टक्के इतके मतदान झाले होते. तर सुप्रिया सुळे यांना 5 लाख 21 हजार 562 इतकी मते मिळाली. तर महादेव जानकर यांना 4 लाख 15 हजार 843 इतकी मते मिळाली. त्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा केवळ 69 हजार 719 इतक्या मतांनी विजयी झाल्या होत्या.
सुप्रिया सुळे या जरी विजयी झाल्या असल्या. तरी महादेव जानकर यांनी त्यांना चांगली लढत दिली होती. एवढ्या कमी मतांनी विजयी झाल्याने सुप्रिया सुळे यानी त्याचा चांगला धसका घेत. मागील पाच वर्षाच्या काळात लोकसभा मतदारसंघात येणार्‍या भोर, वेल्हा, बारामती, दौंड, इंदापूर आणि खडकवासला या विधानसभा मतदारसंघात विविध अनेक कार्यक्रम, नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन मतदार पर्यन्त पोहोचण्याचा प्रयत्न केल्याचे पाहावयास मिळाला.

यंदा देखील आघाडीकडून सुप्रिया सुळे यांना संधी देण्यात आली होती. तर महायुतीकडून आमदार राहुल कूल यांच्या पत्नी कांचन कूल यांना संधी दिली होती. या दोघी महिला उमेदवार असल्याने प्रचाराच्या अगदी सुरुवातीपासून ते अखेरच्या दिवसा पर्यन्त या मतदारसंघात एक वेगळ चित्र पाहण्यास मिळाले. याच दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांच्या सभा झाल्या. तर महायुती च्या उमेदवार कांचन कूल यांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासह अनेक नेत्यांच्या सभा झाल्या. त्यामुळे या बारामती मतदारसंघाची सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. तसेच इतर लोकसभा मतदारसंघाच्या तुलनेत या मतदारसंघात ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणावर असल्याने मतदार पर्यन्त पोहोचणे ही एक सुप्रिया सुळे आणि कांचन कूल यांच्यासाठी तारेवरची कसरत होती. त्यानंतर काल मतदान पार पडले. पण या दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघात 61.54 टक्के इतके मतदान झाले. तर 2014 च्या निवडणुकीत 58.81 टक्के इतके मतदान झाले असून मागील निवडणूकीच्या तुलनेत यंदा जवळपास तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. मतदानाच्या वाढत्या आकडेवारीचा नेमका फायदा आघाडीला का? महायुतीला होणार याबाबत बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी गणेश बिडकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, बारामती मध्ये आजवर मतदान वाढले. त्यावेळी शरद पवार यांच्या विरोधात लाट पाहण्यास मिळाली आहे. त्यामुळे यंदाची मतदानाची आकडेवारी लक्षात घेता सुप्रिया सुळे यांचा पराभव निश्चित आहे. कांचन कूल या 50 हजार मतांनी निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे म्हणाले की, मागील निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची लाट असताना देखील बारामती मधून सुप्रिया सुळे या विजयी झाल्या होत्या. आता पाच वर्षात मोदी चा कारभार लक्षात घेता त्यांची देशात नसून राज्यात आघाडीचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर यंदा बारामती मध्ये सुप्रिया सुळे यांनी मतदान केल्याने मतांची आकडेवारी वाढली आहे आणि पुन्हा सुप्रिया सुळे यांना बारामतीकर प्रचंड मतांनी निवडून देतील असे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button