breaking-newsक्रिडा

पीसीएमसी इलेव्हन, अस्पात ऍकॅडमी यांची विजयी सलामी

  • अजितदादा चषक हॉकी स्पर्धा

पुणे:पीसीएमसी इलेव्हन आणि अस्पात ऍकॅडमी यांनी जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करताना आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर सहज विजय मिळवत अजितदादा चषक हॉकी स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडीयम, नेहरूनगर येथे ही राज्यस्तरीय स्पर्धा सुरु आहे.

आज दिवसभर पावसाचा जोर असतानाही खेळाडूंनी जराही विचलित न होता चांगल्या कामगिरीवर भर दिला. अस्पात ऍकॅडमीने प्रियदर्शनी स्पोर्टस सेंटरवर 7-1 असा विजय मिळविला. तर पीसीएमसीने आनंद गायकवाडच्या तीन गोलांच्या जोरावर सुपर इलेव्हनला 7-2 अशी धूळ चारली.

प्रियदर्शनीविरुद्ध सामन्याच्या पूर्वार्धात अक्षय राजपूतने दोन तर संकेत जोगळेकर, प्रशांत तोडकर आणि शक्‍ती ठाकूर यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवल्यामुळे अस्पात ऍकॅडमीला 5-0 अशी आघाडी मिळाली. प्रियदर्शनीच्या अब्दुल सलामनी याने 24 व्या मिनिटाला एक गोल नोंदवला पण तो एकमात्रच ठरल्याने अस्पात ऍकॅडमीला काळजीचे कारण राहिले नाही. उलट त्यांनी आपल्या गोलांचा धडाका उत्तरार्धातही सुरूच ठेवला. संकेत जोगळेकरने दुसरा गोल 31 व्या मिनिटाला केला तर पृथ्वीराज साळुंकेने 36 व्या मिनिटाला एक गोल केला.

दुसऱ्या सामन्यात, यजमान पीसीएमसी संघाने सहज विजय मिळवला. आनंदने 24व्या 36 व्या आणि 39 व्या मिनिटाला गोल नोंदवत पीसीएमसी संघासाठी मोलाचा वाटा उचलला. त्याला अन्य खेळाडूंचीही चांगली साथ लाभली. अजय गोटे (2 वे मिनिट), वृषभ आव्हाड (9), अभिषेक माने (40) आणि जितेंद्र गव्हाणे (49) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. सुपर इलेव्हनकडून ऋषिकेश सारोलकर (16) आणि योगेश उत्तेकर (32) यांनी एकेक गोल केला.

सविस्तर निकाल-
पीसीएमसी इलेव्हन 7 (अजय गोटे दुसरे मि., वृषभ आव्हाड नववे मि., आनंद गायकवाड 24वे मि., 36वे मि., 39वे मि., अभिषेक माने 40वे मि., जितेंद्र गव्हाणे 49वे मि.) वि. वि. सुपर इलेव्हन (ऋषिकेश सारोलकर 16वे मि., योगेश उत्तेकर 32वे मि.), मध्यंतर- 3-0,
अस्पात ऍकॅडमी (अक्षय राजपूत 13वे मि., 18वे मि., संकेत जोगळेकर 19वे मि., 31वे मि., प्रशांत तोडकर 14वे मि., शक्ती ठाकूर 22वे मि., पृथ्वीराज साळुंके 36वे मि.) वि. वि. प्रियदर्शनी स्पोर्टस सेंटर 1 ( अब्दुल सलामनी 24), मध्यंतर- 5-1.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button