breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपळे सौदागर येथील अंगणवाडीत पोषण अभियानांतर्गत रांगोळी स्पर्धा उत्साहात
पिंपरी – महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीअंतर्गत आयोजित पिंपळे सौदागर येथे अंगणवाडी पोषण अभियानानिमित्त आज शनिवारी (दि. 22) किशोर वयीन मुलींच्या रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. बेटि बचाओ बेटी पढावोचा संदेश देण्यासाठी एका मुलीचा वाढदिवस देखील यावेळी साजरा करण्यात आला. यावेळी नगरसेविका शितल काटे, राष्ट्रवादी कॉंग्रेस असंघटीत कामगार विभाग पुणे जिल्हा अध्यक्षा मीना मोहिते, सर्व अंगणवाडी शिक्षिका, किशोरी मुली उपस्थित होत्या.