breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे साैदागरमध्ये विचित्र अपघात

पिंपरी –  रहाटणी – पिंपळे सौदागर येथील साई चौकामध्ये मागील काही वषार्पासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे शिवार चौकाकडून वाकडकडे जाताना ४५ मीटर रस्त्यावर लोखंडी बार लावण्यात आला आहे. त्यामुळे ठराविक उंचीचीच वाहने येथून जाऊ शकतात. असे असतानाही या बारपेक्षा जास्त उंचीचा ट्रेलर येथून नेण्याचा प्रयत्न एका चालकाने केला. परिणामी ट्रेलर धडकल्याने हा लोखंडी बार तुटला. तुटलेला लोखंडी बार ट्रेलरमध्ये अडकला. त्यामुळे पूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. सकाळी कामावर जाण्याची वेळ असल्याने हिंजवडीकडे निघालेल्या आयटीयन्सना अपघाताचा फटका बसला. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून आयटीयन्स या कोंडीत अडकले होते.

पिंपळे सौदागर येथील साई चौकामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे शिवार चौक ते साई चौकाच्या दरम्यान वाकडकडे जाण्याच्या मार्गावर जास्त उंचीचे वाहने जाऊ नयेत म्हणून लोखंडी बार लावण्यात आले होते. या लोखंडी बारला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक ट्रेलर धडकला. दोन जुन्या ट्रकच्या च्यासी या ट्रेलरमध्ये होत्या. ट्रेलरचालकाला उंचीचा अंदाज न आल्याने ट्रेलर लोखंडी बारला धडकला. यात लोखंडी बार तुटून  ट्रेलरवर कोसळला. परिणामी ट्रेलर लोखंडी बारमध्ये अडकला. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. या अपघातानंतर ट्रेलरचालक पसार झाला.

साई चौकातील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने डांगे चौकाकडून येणारी वाहतूक शिवाजी चौकातून वळवण्यात आलेली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी असते. त्यात ट्रेलरचा अपघात झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्थानिकांसह वाहतूक पोलिसांची तारांबळ झाली. शिवार चौकाकडून पुण्याकडे जाणारे व हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी असते. त्याच वेळेस या ट्रेलरला अपघात झाला. अपघातग्रस्त ट्रेलर क्रेनच्या साह्याने रस्त्याच्या कडेला घ्यायचे म्हटले तर या ट्रेलरवर असणाऱ्या दोन जुन्या ट्रकच्या चाचीस खाली पडण्याची शक्यता होती. त्यामुळे हा ट्रेलर बाजूला कसा करावा हा मोठा प्रश्न वाहतूक पोलिसांसमोर पडला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button