breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे निलखमध्ये महिलेचा विनयभंग

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मैत्रीणीला भेटण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 9) दुपारी दीडच्या सुमारास सावीत्रीबाई फुले बागेजवळ पिंपळे निलख येथे घडला.

अभि दिलीप सपकाळ (वय 34, रा. थेरगाव, पूर्ण पत्ता माहित नाही) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेने यासंदर्भात तक्रार केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मैत्रीणीला भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी पिंपळे निलख येथील सावित्रीबाई फुले बागेजवळ त्यांचा मित्र आला. मित्राने महिलेला जवळ ओडून अश्लिल चाळे केले. मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. वरून तुझे फोटो व्हायरल करेन, अशी धमकीही दिली. तुझ्या घरचे यात आले तर त्यांनाही मारून टाकेन, असाही दम भरला. त्यामुळे त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button