breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपळे निलखमध्ये आमदार जगताप यांच्या हस्ते नवीन ‘एसटीपी’चे भूमिपूजन

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 विशालनगर येथील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता याठिकाणी ज्येष्ठ नगरसेविका आरती चोंधे यांच्या पाठपुराव्याने 15 दशलक्ष लिटर क्षेमतेचा मैलाशुध्दीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते झाले.

पिंपळे निलख भागात सध्या राहत असलेल्या नागरिकांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभारलेला 20 दशलक्ष लिटर क्षमतेचा मैलाशुध्दीकरण प्रकल्प कार्यरत आहे. मात्र, शहरीकरणामुळे विशालनगर भागातील नागरिकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या नागरीकरणाचा विचार करता आगामी काळात या एसटीपी प्रकल्पाची क्षमता मर्यादीत राहणार आहे. त्यामुळे भविष्यात उच्च क्षमतेच्या मैलाशुध्दीकरण प्रकल्पाची गरज भासणार आहे.

त्यासाठी ज्येष्ठ नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्या आरती चोंधे यांच्या पाठपुराव्याने नवीन 15 दशलक्ष लिटर क्षमतेच्या मैलाशुध्दीकरण प्रकल्पाचे काम मार्गी लागत आहे. या प्रकल्पाचे भूमीपूजन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते नुकतेच झाले आहे. ज्येष्ठ नगरसेविका आरती चोंधे यांच्यासह स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, नगरसेवक तुषार कामठे, संदिप कस्पटे, मलःनिसरण विभागाचे अधिकारी, तसेच प्रभागातील नागरीक उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button