breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे सौदागर ते पुणे मनपा तेजस्विनी बस धावणार; शुक्रवारी होणार उद्घाटन

पिंपरी ( महा ई न्यूज ) – भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे सौदागर ते पुणे महापालिका या मार्गावर पीएमपीएमएलची तेजस्विनी बस सुरू करण्यात येणार आहे. त्याचे उद्घाटन आमदार जगताप यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१५) उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दिली.

यासंदर्भात नगरसेवक शत्रुघ्न काटे म्हणाले, “केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पिंपळेसौदागरचा समावेश आहे. पिंपळेसौदागर परिसरात राहणारी ७० टक्के लोकसंख्या आयटी क्षेत्रात काम करणारी आहे. त्यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पिंपळेसौदागरमधून पुण्यातील विविध भागात कामांसाठी जाणाऱ्या महिलांची सुरक्षा महत्त्वाची आहे. या महिलांना आपल्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.

त्यानुसार भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी पिंपळेसौदागर ते पुणे महापालिका या मार्गावर फक्त महिलांसाठी धावणारी पीएमपीएमएलची तेजस्विनी बस सुरू करण्यात येणार आहे. त्याबाबत पीएमपीएमएलच्या वाहतूक व्यवस्थापक विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. वाहतूक विभागाच्या मान्यतेनंतर पिंपळेसौदागर ते पुणे महापालिका मार्गावर तेजस्विनी बस सुरू होणार आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते शुक्रवारी या बसचे उद्घाटन होईल, असे त्यांनी सांगितले.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button