breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपळेगुरवमध्ये बांधकामासह हातगाड्यावर कडक कारवाई

पिंपरी – महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने ‘ड’ आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय परिसरात अतिक्रमण केलेल्या हातगाड्यासह बांधकामावर कडक कारवाई करण्यात आली. यामध्ये 26 हातगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ‘ड’ आणि ‘ह’  क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्राअंतर्गत सृष्टी चौक, साठ फुटी रस्ता, रामकृष्ण चौक, काटेपुरम चौक, डायनोसर गार्डन येथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. पालिकेच्या अनधिकृत व अतिक्रमण नियंत्रण विभागाने या अतिक्रमाणावर धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये 26 हातगाड्या, एक लोखंडी टेबल जप्त करण्यात आले.

सहशहर अभियंता यांच्या अधिपत्याखाली महापालिकेचे संबंधीत कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे पाच कार्यालयीन अधीक्षक, नऊ मुख्य लिपिक, पालिकेचे 50 मजूर, एक क्रेन, एक जेसीबी, चार डंपरच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button