breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी महानगरपालिकेच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पिंपरी –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

आज (रविवारी) सकाळी महानगरपालिका भवनात झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलीप गावडे, अतिरिक्त आरोग्य वैदयकिय अधिकारी डॉ.पवन साळवे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संजय भोसले, प्रशासन अधिकारी रामकिसन लटपटे, सेवानिवृत्त अधिकारी शरद जाधव, वसंत साळवी, रविंद्र दुधेकर आदी उपस्थित होते. त्यानंतर पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या पुतळ्यासही अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील व दिलीप गावडे यांनी पुष्पहार अर्पण करुन माहामानवांना अभिवादन केले.

तसेच एच.ए.कॉलनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासही अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील व दिलीप गावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी एच ए कंपनीचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

त्यानंतर दापोडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील व दिलीप गावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मोठया संख्येने नागरिक व मान्यवर उपस्थित होते. महानगरपालिकेच्या वतीने महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन पर्वानिमित्त आयोजित रांगोळी प्रदर्शनाला आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भेट दिली. तसेच रांगोळीतून
साकारलेल्या महापुरुषांच्या चित्रांचे त्यांनी कौतुक केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button