breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरास सम प्रमाणात पाणी पुरवठ्यासाठी एजन्सीची नियुक्ती

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात पाणीपुरवठा वितरण व्यवस्था अधिक सक्षम केली जात आहे. सन 2020 पर्यंतची लोकसंख्या लक्षात घेऊन संपूर्ण शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी तज्ज्ञ खासगी एजन्सीचे सहाय घेत असून त्या कामापोटी 4 कोटी 13 लाख 7 हजार रूपये शुल्क अदा करणार आहे.   
महापालिका दररोज 490 एमएलडी पाण्याचा उपसा रावेत बंधारा येथून करते. तसेच, एमआयडीसीकडून रोज 30 एमएलडी पाणी घेते. त्यापैकी दररोज 40 टक्के पाणी गळती होते. गळती रोखण्यासाठी जेएनएनयुआरएम अंतर्गत 40 टक्के भागांसाठी 24 बाय 7 पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. तसेच, अमृत योजनेत उर्वरित 60 टक्के भागामध्ये पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी 4 विविध प्रकल्प चालू आहेत.
या दोन्ही प्रकल्पात जुन्या वाहिन्या व नळजोड बदलणे. हायड्रोलिक डिजाईननुसार नवीन जलवाहिनी टाकली जात आहे. या कामात किवळे, मामुर्डी, वाकड, चर्‍होली, वडमुखवाडी, डुडुळगाव, चिखली हा भागाचा नव्याने समावेश केला आहे. तसेच, भामा आसखेड व आंद्रा धरणातून पाणी आणण्याचा प्रकल्प राबविला जाणार आहे. या सर्व कामांचा आराखडा डीआरए कन्स्लटंट या खासगी सल्लागार एजन्सीने तयार केला आहे. चिखली येथे 100 एमएलडी क्षमतेचा पाणी शुद्धीकरण प्रकल्प बांधण्याची निविदा प्रसिद्ध झाली आहे. देहू बांधर्‍यातून चिखलीच्या नियोजित प्रकल्पापर्यंत जलवाहिनीने पाणी आणण्याची कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे.
हे सर्व काम नियोजनबद्धरित्या झाल्यास सन 2020पर्यंतच्या लोकसंख्येनुसार संपूर्ण शहराला योग्य प्रकारे पाणीपुरवठा होऊ शकणार आहे. त्यासाठी या कामांचे अंदाजपत्रक तयार करणे, आराखडश तयार करणे, निविदा तयार करणे आदी कामांसाठी डीआरए कन्स्लटंटला वाढीव कामाची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यांचे संपूर्ण शुल्क 4 कोटी 13 लाख 7 हजार इतके आहे. या खर्चाला मान्यता देण्याचा प्रस्ताव येत्या बुधवारी (दि.26) होणार्‍या स्थायी समितीसमोर आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button