breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र वीज वितरण मंडळ स्थापन करा – लक्ष्मण जगताप यांची मागणी

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना वीज समस्यासाठी पुणे शहरात जावे लागते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र वीज वितरण मंडळ स्थापन करावे, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना वीज समस्यासाठी पुणे शहरात जवळ्पास 10 किमी दूर जावे लागते. सध्या शहरात उच्च्दाब ग्राहक व लघुदाब ग्राहक सुमारे(LT ग्राहक 6013117, HT- 972) 602289 आहेत. 2लाख ग्राहकांना एक विभागीय कार्यालय या नुसार शहराची तीन वीज वितरण विभागीय कार्यालयाची गरज आहे. तीन विभागीय कार्यालयांसाठी एक मंडळ कार्यालय या प्रमाणे पिंपरी चिंचवड शहराला वीज अधिकारी कर्मचारी व कार्यालये यांची पुनर्र्चना करणे आवश्यक आहे. भविष्यात या भागात मोठ्या प्रमाणात नागरिकवस्ती वाढत आहे. पुढील काळात ही ग्राहकसंख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने ही रचना करणे आवश्यक आहे.
शहरात महसूल, पोलीस यांची स्वतंत्र कार्यालये करण्यात आलेली आहेत. ईतर शासकिय कार्यालयांचीही स्थापना करण्याची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे. तरी, पिंपरी-चिंचवड शहरासाठी वीजवितरण कार्यालयांची पुनर्र्चना करून शहरासाठी स्वतंत्र मंडळ कार्यालय तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी लेखी निवेदनाव्दारे आमदार लक्ष्मण जगताप यांनी उर्जा मंत्री चंन्द्रशेखर बावनकुळे यांना केली आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button