breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या गणेशोत्सव देखावा स्पर्धेचे येत्या शुक्रवारी बक्षीस वितरण

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महालिकेच्या वतीने सन 2017 मध्ये सार्वजनिक गणेश मंडळांसाठी गणेशोत्सव स्पर्धा घेण्यात आली होती. त्याचा बक्षिस वितरण येत्या शुक्रवारी (दि.21) चिंचवड येथील ऍटो क्लस्टर सभागृहात सायंकाळी 4 वाजता होणार आहे. समारंभात  महापौर राहुल जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली.
महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बक्षिस वितरण सोहळ्यास खासदार अमर साबळे, भाजपाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, उपमहापौर सचिन चिंचवडे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत.
सण, उत्सवाबाबत न्यायालयीन निर्णयामुळे खर्चावर मर्यादा आल्याने पिंपरी महापालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षिस वितरण अद्याप केलेले नाही. गणेश मंडळांसाठी गणेशोत्सव स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा महापालिकेच्या खर्चातून नसून तो महापौर राहुल जाधव व सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या पुढाकाराने भाजप स्वता: हा कार्यक्रम करीत आहे. त्यावर गणेशोत्सवाच्या कालावधीत या सार्वजनिक गणेश मंडळांना बक्षिसे मिळणार, असे स्पष्टीकरण महापौर राहूल जाधव व सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्रकार परिषदेत केले.
सत्ताधारी भाजपला हा बक्षिस वितरण सोहळ्याचा विसर पडल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला होता. त्यानंतर महापौर राहूल जाधव व पक्षनेते एकनाथ पवार यांनी खुलासा केला. ते म्हणाले की, पालिकेच्या खर्चातून सण, उत्सव साजरे करण्यास न्यायालयाच्या निर्णयामुळे अडथळा आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे विलंब झाला आहे. महिनाभरापूर्वीच मंडळांना हा सोहळा होणार असल्याची ग्वाही आपण दिली होती. त्यामुळे विसर पडल्याच्या आरोपात कसलेही तथ्थ नाही. स्पर्धेतील विजेत्या मंडळांना ठरलेली बक्षिसे गणेशोत्सव काळातच मिळणार आहेत.
दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते गणेशोत्सव स्पर्धेमध्ये प्रथम आलेल्या मंडळासह सर्व विजेत्या मंडळांना बक्षिस देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती सत्तारूढ पक्षनेते पवार यांनी दिली.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button