breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘पिंपरी-चिंचवड महापालिका-वन’ या अॅपद्वारे एका क्लिकवर मिळणार शहराची माहिती

पिंपरी ( महा ई न्यूज ) – नागरिकांना संपुर्ण शहराची माहिती, चित्रफित, संदेश, वाहतूक कोंडी, पाणी टंचाई, रस्ते खोदाई यासह आदी माहिती ‘पिंपरी-चिंचवड महापालिका-वन’ या अॅपद्वारे एका क्लिकवर मिळणार आहे. या अॅपचे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते आज (बुधवारी) अनावरण करण्यात आले. यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेविका भीमाबाई फुगे, निर्मला गायकवाड, आयुक्त श्रावण हर्डिकर, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण उपस्थित होते. 

राष्ट्रीय पातळीवर सुरु केलेल्या नाविन्यपुर्ण व स्टार्टअप उपक्रम अंतर्गत राज्य सरकारने नविन उद्योजकांना व्यवसायाच्या संधी प्राप्त करुन दिल्या आहेत. त्या अनुषंगाने महापालिकेमार्फत देखील या बाबतचे सहाय्यभुत धोरण राबविले जात आहे. त्या अंतर्गत पालिकेने ‘पिंपरी-चिंचवड – वन’ या नावाने मोबाईल अॅप कार्यन्वित केले आहे. या मोबाईल अॅप द्वारे नागरिकांना आवश्यक माहितीचे प्रसारण, संदेश, परिपत्रक, निवेदन इत्यादी स्वरुपाची सर्व माहिती एकाच अॅप द्वारे नागरिकांना सहजरित्या उपलब्ध होणार आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, नागरिकांना माहिती देणे व ती उपलब्ध करणे हे सुशासनासाठी उपयुक्त आहे. ‘पिंपरी-चिंचवड वन अॅप’ हे महापालिकेसाठी महत्वाचा पुढाकार असून योग्य रणनिती आहे. याद्वारे महापालिका थेट नागरिकांच्या संपर्कात राहील. आपत्ताकालीन वेळेस पालिकेला कोणते आवाहन करायचे असल्याच या अॅपद्वारे केले जाईल. आजारांबाबत जनजागृती केली जाईल. शहरामध्ये होणा-या घडामोडीची माहिती तातडीने नागरिकांना या अॅपद्वारे मिळणार आहे.

‘पिंपरी-चिंचवड-वन’ मोबाईल अॅप द्वारे नागरिकांना एकाच ठिकाणी शहरांची संपुर्ण माहिती, चित्रफित, संदेश, तसेच कोणतीही तातडीची माहिती अॅप द्वारे शोधता येईल. या अॅप मध्ये माहितीचे विविध विषयवार स्वतंत्र भाग केले असून त्याबाबतचे नवे अपडेट त्या भागामध्ये विषयवार समाविष्ट करण्यात येणार आहेत. त्याचा महापालिकेने वापर सुरु केला असून पोलीस देखील त्याचा उद्यापासून वापर सुरु करणार आहेत. तसेच महापालिका, सारथी अॅपला हे लिंक करण्याचे काम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button