breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरी-चिंचवडसाठी बंदिस्त जलवाहिनीचे काम मार्गी लावणार – शिवसेनेची भूमिका

  • जूने शिवसैनिक नाराज नाहीत, नवे-जूने मिळून पक्षाचं निष्ठेने काम करणार
  • अनधिकृत बांधकाम प्रश्नावर, न्यायालयीन प्रक्रियेमुळे बोलण्यास नकार

पिंपरी, ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहराला पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या सात वर्षांपासून पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाला मुख्यमंत्र्याची स्थगिती आहे. मागील पाच वर्षात भाजप-शिवसेनेकडून मावळ गोळीबार प्रकरणाचे राजकारण करुन हा प्रकल्प बासनात गुंडाळला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पातील शेतक-यांशी बोलून हा प्रकल्प मार्गी लावण्यात येईल, असे अनेकदा सांगितले. त्यावर अजूनही काहीच झालेले नाही.

दरम्यान, शिवसेनेचे शहराध्यक्ष योगेश बाबर म्हणाले की, पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प पुर्ण झाला पाहिजे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराचा पाणी प्रश्न मिटणार आहे. या प्रकल्पातील शेतक-यांना विश्वासात घेवून या प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यात येईल, असे त्यांनी आज (बुधवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेची भूमिका जाहीर केली.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे भाजपा, शिवसेना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराची माहिती देण्यासाठी आज (बुधवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पिंपरी-चिंचवडचे संपर्कप्रमुख बाळाभाई कदम, महिला संपर्कप्रमुख वैशाली सूर्यवंशी, महिला संघटिका उर्मिला काळभोर, सरिता साने, कामगार नेते इरफान सय्यद, सल्लागार मधुकर बाबर, पिंपरी विधानसभाप्रमुख, नगरसेवक प्रमोद कुटे, चिंचवड विधानसभाप्रमुख अनंत को-हाळे, महिला आघाडीच्या माजी संघटिका सुनीता चव्हाण, माजी शहरप्रमुख रामगिरी गोसावी, माजी नगरसेवक प्रकाश बाबर आदीजण उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पापुढे अजूनही अडचणी आहेत. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी पुणे-मुंबई महामार्गावर शेतकरी रस्त्यावर उतरले होते. आंदोलकांना रोखण्यासाठी  पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन शेतकर्‍यांना जीव गमवावा लागला होता, तर दहा शेतकरी जखमी झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पग्रस्तांशी बोलून हा प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्‍वासन पिंपरीतील एका कार्यक्रमात दिले होते. मात्र, शिवसेनेने मावळ परिसरात वेगळी आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वेगळी भूमिका घेतल्याचे अनेकवेळा दिसून आलेले आहे. त्यामुळे महायुतीची सत्ता असतानाही अजूनही प्रकल्प मार्गी लागलेला नाही  त्यावर शेतक-यांशी चर्चा, विचारविनिमय करुन पवना जलवाहिनी प्रकल्पा मार्गी लावण्यात येणार असल्याचे शिवसेनेने भूमिका जाहीर केली.

शहरातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न भाजप-शिवसेनेच्या काळात अजूनही प्रलंबित आहे. यावर बाळा कदम म्हणाले की, अनधिकृत बांधकामाचा प्रश्न पिंपरी-चिंचवडचा नव्हे तर राज्याचा प्रश्न आहे. त्या प्रश्नावर राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. परंतू, न्यायालयात आक्षेप घेतल्याने अजूनही प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे न्यायालयीन प्रश्नामुळे यावर अधिक बोलता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच रवींद्र मिर्लेकर म्हणाले, ” महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मागील पाच वर्षात विकासकामे केली आहेत. मावळात महायुतीसाठी परिस्थिती चांगली आहे. जुना शिवसैनिक आशीर्वाद घेऊन पाठिशी उभा असून प्रचारात सक्रिय झाला आहे. जुने अनुभवी शिवसैनिक आणि नवे सैनिक यांच्यात योग्य समतोल आहे. जुन्या आणि नव्या शिवसैनिकांनी एकदिलाने काम सुरु केले आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे”

बाळा कदम म्हणाले, “शिवसेना-भाजप महायुतीचे नेते, पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ता स्वत: उमेदवार समजून काम करत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये एकोपा आणि एकजूट कायम आहे. प्रत्येक कार्यकर्ता आपल्या परिने मनापासून प्रचार करत आहे. शेवटच्या मतदारापर्यंत पोहचत आहे” त्यामुळे महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button