breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये शिवजन्मोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा, त्यांच्या कार्यांचा प्रचार-प्रसार होणार आहे. याकरिता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आणि शिवजयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने अखिल पिंपरी-चिंचवड शहर सार्वजनिक शिवजन्मोत्सव दि. १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीमध्ये सोहळ्याचे आयोजन केले आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज समाज प्रबोधन पर्वाचे उद्घाटन रविवार दि.१७ फेब्रुवारी २०१९ रोजी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते निगडीतील भक्ती- शक्ती समूह शिल्प उद्यानात सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव राहणार आहे. यावेळी सायंकाळी पाच वाजता झी मराठी फेम शिवशाहीर देवानंद माळी यांचा शाहिरी कार्यक्रम होणार आहे.

सोमवारी दि. 18 फेब्रुवारी सायंकाळी 6 वाजता डाॅ. अमोल कोल्हे यांचे मनोगत आणि डाॅ. आ.ह.सांळुखे यांचे व्याख्यान होणार आहे. मंगळवार दि. 19 फेब्रुवारी सकाळी 9 ते 11 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे व पालखी सोहळा मिरवणूक होणार आहे. यामध्ये वारकरी, ढोलताशा पथक, लेझीम पथक, शिवजन्मोत्सव पाळणा, ढोलताशा स्पर्धेत भव्य बाईक रॅलीचे आयोजित केली आहे.

मंगळवारी दि. 19 फेब्रुवारी सायंकाळी 6 ते 10 वाजता मराठ्यांची गाैरवगाथा एक महानाट्य हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये 250 कलाकार, दोन मजली रंगमंच, घोडे, उंट व बैलगाडी असे विशेष आकर्षण असणार आहे.

महानगरपालिकेचे सर्व पदाअधिकारी, अधिकारी व पिंपरी चिंचवड शहरातील शिवप्रेमी संघटना, गणेश मंडळे ,जेष्ठ नागरिक संघ यांनी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित
रहावे, असे आवाहन शिवजयंती उत्सव समितीने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button