breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला धक्का, आझम पानसरे यांचे सुपुत्र निहाल यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे दिग्गज नेते माजी महापौर आझम पानसरे यांचे सुपुत्र निहाल पानसरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आझम पानसरे सध्या आजारी असल्यामुळे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी घरी जाऊन त्यांची विचारपूस केली होती. त्यावर पानसरे यांचे सुपुत्र राष्ट्रवादीत परतले असून काही दिवसांनंतर आझम पानसरे देखील स्वागृही परतणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

आझमभाई पानसरे पिंपरी-चिंचवडमधले दिग्गज नेते मानले जातात. त्यांच्या खंबीर पाठिंब्यावर शहरातले अनेक कार्यकर्ते नेते बनले, महापौरांचे आमदार झाले, आमदारांचे खासदार होऊ पाहत आहेत. परंतु, पानसरे यांचा राजकीय मार्ग वेळोवेळी खडतर बनला आहे. तरी, त्यांनी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच आपली आजपर्यंतची राजकीय कार्यकीर्द घालवली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यावर दबाव वाढवून त्यांचा भाजपात प्रवेश करवून घेतला. त्यासाठी त्यांना महामंडळावर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांवर संधी देण्याचे आश्वासन देखील भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. ते अद्याप पूर्ण केले नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पानसरे आणि त्यांचे हजारो समर्थक भाजपवर नाराज असल्याचे बोलले जाते. केवळ सत्ता आणण्यासाठीच पानसरे यांचा वापर करणार का, असा प्रश्न देखील त्यांच्या काही समर्थकांनी उपस्थित केला होता.

काही दिवसांपासून ते किरकोळ अजारी असल्यामुळे त्यांची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घरी जाऊन त्यांच्या भेट घेतली. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील त्यांच्या घरी गेले होते. त्यांच्या प्रकृतीची दखल घेतली. त्यांच्या या भेटीचा सकारात्मक परिणाम पानसरे कुटुंबियांवर झाल्याचे दिसते. आझम पानसरे यांचे सुपुत्र निहाल पानसरे यांनी काल राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. काही दिवसांनंतर पानसरे देखील स्वागृही परतणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button