breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा “दावतनामा”

  • पालकमंत्री, आमदारांची उपस्थिती

पिंपरी – सध्या रमजान सुरू असल्याने मुस्लीम समाजबांधवांतर्फे इफ्तार पार्टीची दावत दिली जात आहे. त्याचप्रकारे पिंपरी-चिंचवडमध्ये मुस्लीम राष्ट्रीय मंच आणि जिजाई प्रतिष्ठानच्या वतीने रोजा इफ्तार पार्टी आयोजित केली आहे. पालकमंत्री गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, माजी महापौर आझमभाई पानसरे मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देणार आहेत.

रमजानचा महिना सुरू असल्याने असंख्य मुस्लिम बांधवांकडून रोजा धरला जातो. त्यातच समाजबांधवांना एकत्रीत बोलावून त्यांना स्नेहभोजन देण्यासाठी इफ्तार पार्टी दिली जाते. त्याचबरोबर समाजबांधवांकडून दिवसातून पाचवेळा नमाजपठण आणि उपवास केला जातो. त्यामुळे रमजान महिन्याचे महत्व समाजबांधवांमध्ये अनन्यसाधारण आहे. त्यामुळेच मुस्लिम बांधवांना रमजाननिमित्त भाजपकडून इफ्तारचे आयोजन केले आहे.

ही इफ्तार पार्टी बुधवारी (दि. 13) सायंकाळी सहा वाजता कासारवाडी रेल्वे स्टेशन जवळील गंधर्व गरिमा गार्डन येथे होणार आहे. या इफ्तारला पालकमंत्री गिरीश बापट, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, माजी महापौर आझम पानसरे, जिजाई प्रतिष्ठानच्या अध्यक्ष तथा भाजपच्या नगरसेविका सीमा सावळे, आशा धायगुडे-शेंडगे, भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुस्लिम समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या जाणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button