breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील ‘बाहुबली’

  • आमदार जगताप ठरले मावळचे किंगमेकर
  • सोशल मीडियावर नेटक-यांचा धुमाकूळ

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय झाल्याने विरोधकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. सर्वाधिक चिंचवड विधानसभा मतदार संघातून मताधिक्य मिळवून देण्यात भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यशस्वी ठरल्यामुळे बारणे यांच्या विजयाबद्दल त्यांच्या कार्यकर्त्यांकडून भाऊंचे आभार मानले जात आहे. जगताप हे मावळचे किंगमेकर ठरले असून त्यांना पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील बाहुबली अशी उपाधी दिली जात आहे.

  • पिंपरी-चिंचवडचे राजकारण आमदार लक्ष्मणभाऊ केंद्रीत असल्याने त्यांच्या शब्दाला मोठी किंमत दिली जाते. त्यातच मावळ लोकसभा मतदार संघात चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. त्यामुळे युतीधर्म पाळून खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयाची जबाबदारी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या खांद्यावर सोपविली होती. राजकीय वैर बाजुला ठेवून भाऊ ती जबाबदारी पार पाडतील का, असा प्रश्न कायम उपस्थित होत होता. परंतु, मुख्यमंत्र्यांना दिलेला शब्द पाळून लक्ष्मणभाऊंनी 1 लाख 76 हजार 475 एवढे मताधिक्य दिले. त्यामुळे बारणे यांना भाऊंनी पिंपरी आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदार संघातच विजयी केले. त्यामुळे त्यांच्यावर युतीच्या कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

भाजप आणि शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाऊंना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या आहेत. तर, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षावर केला जात आहे. मावळचा खरा किंगमेकर भाऊच अशा पोस्ट व्हायरल होत आहेत. तर, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील बाहुबली, अशी उपाधी त्यांना देण्यात आली आहे. निवडणूकपूर्व काळात भाऊंनी काहीसा वेगळा पवित्रा घेतल्यामुळे त्यांच्याबाबतीत विरोधी वातावरण तयार झाले होते. त्यामुळे भाऊ युती धर्म पाळतील का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. परंतु, भाऊंनी बारणे यांना मताधिक्य देऊन आपला करिष्मा दाखवून दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button