breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांचा राजीनामा?

– स्थायी समिती सदस्य राहुल जाधव यांचाही एल्गार

– विकास शिंदे 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे लांडगे यांचे कट्टर समर्थक असलेल्या महापौर नितीन काळजे यांनी राजीनामा दिल्याचे समजते. तसेच, स्थायी समिती सभापतीपदाचे दावेदार असलेल्या नगरसेवक राहुल जाधव यांनीही स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, अशी माहिती शहर भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

महापालिका तिजोरीच्या चाव्या आपल्या समर्थकाच्या हाती घेण्यासाठी भाजप नेत्यांच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. वरिष्ठ पातळीवरुन सूत्रे हालविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदार जगताप आणि आमदार लांडगे समर्थक नगरसेवकांची बैठक घेतली होती. त्यावेळी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरुन चिंचवडमधील नगरसेविका ममता गायकवाड यांना स्थायीच्या अध्यक्षपदी संधी देण्याचे वृत्त वा-यासारखे पसरले. त्यामुळे आमदार लांडगे गटाला डावलल्याच्या भावनेतून महापौर काळजे आणि नगरसेवक जाधव यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त् आहे.

दरम्यान, भाजपच्या स्थानिक पदाधिका-यांशी चर्चा केली असता, कोणत्याही पदाधिका-याने राजीनामा अथवा नाराजी व्यक्त केलेली नाही, असा दुजोरा दिला आहे. त्यामुळे आमदार लांडगे गटातील पदाधिका-यांनी कोणती भूमिका घेतली आहे? ही बाब अद्याप गुलदस्त्यात आहे.. ‘श्रीमंत महापालिकेची’ स्थायी समिती कोणत्या गटाकडे जाणार, कोण अध्यक्ष होणार याकडे राजकीय वर्तुळासह शहराचे लक्ष लागले आहे. दरम्यान, स्थायी समितीचे अध्यक्षपद चिंचवड विधानसभा मतदार संघाकडे जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आज (शनिवारी) दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज भरायचे आहेत.  महापौर नितीन काळजे, मावळत्या स्थायी समिती अध्यक्ष सीमा सावळे आणि सभागृह नेते एकनाथ पवार हे तिघेही भोसरी मतदार संघातून निवडून आले आहेत. त्यांच्या रुपाने पालिकेतील तीनही महत्वाची पदे भोसरी मतदार संघाकडे होती. महापौर काळजे हे आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक आहेत. तर, सीमा सावळे या आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कट्टर समर्थक असून त्यांच्या शिफारसीमुळे त्यांच्याकडे स्थायीचे अध्यक्षपद देण्यात आले होते. तर, एकनाथ पवार हे भाजपचे जुने-जानते आणि निष्ठावान कार्यकर्ते आहेत. तीनही पदे भोसरी मतदार संघात असल्यामुळे समतोल साधण्यासाठी यावेळी स्थायीचे अध्यक्षपद चिंचवड विधानसभा मतदार संघाकडे दिले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button